यजुवेंद्र चहलनं शेअर केला रोमँटीक फोटो ! होणाऱ्या पत्नीनं केली ‘अशी’ कमेंट

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आरसीबीचा (RCB) क्रिकेटर यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची होणारी पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) अनेकदा सोशलवर चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच धनश्रीनं धमाकेदार डान्स करत साऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यावेळी धनश्री दुबईत (Dubai) होती. ती आयपीएल 2020 (IPL-2020) सामन्यात यजुवेंद्रला प्रोत्साहित करताना दिसली होती. एका फोटोमुळं आता ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आयपीएलनंतर यजुवेंद्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला तर धनश्री ही पुन्हा भारतात परतली होती. चहलनं धनश्री सोबतचा एक रोमँटीक फोटो शेअर केला आहे. हा फोटो धनश्रीनंच क्लिक केला आहे. दुबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील हा फोटो आहे. सध्या हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

चहलनं शेअर केलेला हा फोटो समोर आल्यानंतर अनेक चाहते यावर कमेंट करू लागले. चाहत्यांसोबत धनश्रीनंही या फोटोवर भन्नाट कमेंट केली आहे. आपल्या कमेंटमध्ये धनश्री म्हणते, एकदम मस्त सेल्फी… अगदी पट्टीच्या फोटोग्राफरनं फोटो काढावा तसा फोटो. अनेक कमेंटमध्ये धनश्रीच्या कमेंटनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

धनश्रीबद्दल बोलायचं झालं तर ती एक डॉक्टर आहे सोबतच ती एक डान्सरही आहे. युट्युबवरही तिला लाखो लोक फॉलो करतात. धनश्री कायमच आपले फोटो आणि डान्स व्हिडीओ यामुळं चर्चेत असते.

 

You might also like