Hot Water Bath | जर तुम्हाला सुद्धा हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करायला आवडत असेल तर व्हा सावध; होऊ शकते ‘हे’ गंभीर नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हिवाळ्यात (Winter) अनेकदा लोकांना आंघोळ करावीशी वाटत नाही आणि आंघोळ केली तरी गरम पाण्याचा (Hot Water Bath) वापर करतात. गरम पाण्याने आंघोळ करताना तुम्हाला मजा येत असली तरी त्यामुळे तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. या पाण्याचे (Hot Water Bath) तापमान केवळ 32 अंश सेल्सिअस पर्यंत असावे, असे संशोधनात म्हटले आहे (Bathing With Hot Water Can Cause Serious Damage).

 

यापेक्षा जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास अनेक शारीरिक समस्यांना (Physical Problems) सामोरे जावे लागू शकते. पाण्याच्या तापमानाची आपल्याला अचूक कल्पना नसल्याने गरम पाण्याने आंघोळ (Hot Water Bath) केल्याने नुकसान होऊ शकते.

 

त्वचा चमक गमावते (Loss of Skin Glow)
गरम पाण्यामुळे त्वचेतील आर्द्रता (Skin Moisture) कमी होते, त्यामुळे त्वचेची चमक (Skin Glow) कमी होते.

 

त्वचेला इन्फेक्शन (Skin Infections) होऊ शकते
गरम पाणी त्वचेतील ओलावा शोषून घेते, ज्यामुळे त्वचेला इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.

सुरकुत्यांची समस्या (Wrinkles Problem)
गरम पाण्यामुळे, त्वचेच्या पेशींचे (Skin Cells) नुकसान होते आणि त्या खराब होऊ लागतात ज्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या (Premature Wrinkles) दिसू शकतात.

 

केस कोरडे (Dry Hair) होतात
गरम पाण्यामुळे केस कोरडे होतात त्यामुळे ते गळू (Hair Fall) लागतात. गरम पाण्यामुळे केसांची आर्द्रता (Moisture of Hair) कमी होते, ज्यामुळे केस खडबडीत (Rough) आणि कोरडे (Dry) होऊ शकतात.

 

कोंडा (Dandruff) वाढू शकतो
डोके खूप गरम पाण्याने धुतल्यास स्काल्प (Scalp) कोरडे होते, अशा स्थितीत कोंडा वाढतो.

 

– डोळ्यांची समस्या (Eye Problems)
गरम पाण्याने आंघोळ केल्याने डोळ्यांतील ओलावाही कमी होतो, त्यामुळे डोळ्यांना लालसरपणा, खाज सुटणे आणि वारंवार पाणी येण्याची समस्या उद्भवू शकते.

 

Web Title :- Hot Water Bath | if you also like to take bath with hot water in winter then be careful it can be serious damage

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC IPO | पॉलिसी होल्डर्स ‘या’ 2 गोष्टींशिवाय इश्यूमध्ये करू शकत नाहीत गुंतवणूक, जाणून घ्या सविस्तर

 

Madhuri Dixit | 54 वर्षीय माधुरी दीक्षितनं घातला एकदम पातळ पट्टीचा ‘कडक’ बोल्ड ड्रेस, ‘धक-धक गर्ल’चा बोल्डनेस पाहून सारेच घायाळ

 

Rahul Bajaj Net Worth | राहुल बजाज यांनी मागे सोडली ‘इतक्या’ कोटींची संपत्ती; Bajaj Chetak ला बनवले होते प्रत्येक घराची शान, जाणून घ्या त्यांच्याबाबत काही महत्वाच्या गोष्टी