Hot Water Side Effects : आपणही हिवाळ्यात ‘गरम’ पाणी पिता का ? जाणून घ्या त्याचे ‘नुकसान’

पोलीसनामा ऑनलाईन : पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पाण्यामध्ये मिनरल्स (Minerals) सोबतच बरेच इतर घटक देखील असतात, जे आरोग्याच्या बाबतीत खूप फायदेशीर असतात. आजकाल बहुतेक लोक हिवाळ्याच्या हंगामात (Winter Season) गरम पाण्या (Hot Water) चे सेवन करत आहेत.

गरम पाणी पिल्याने होते नुकसान

हिवाळ्याच्या हंगामात (Winter Season) बहुतेक लोक गरम पाणी (Warm Water) पितात. गरम पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी (Weight Loss) होऊ शकते आणि त्वचा (Skin) व आरोग्या (Health) शी संबंधित अनेक समस्यांपासूनही (Health Problems) मुक्तता मिळते. पण आपणास हे माहित असावे की अधिक गरम पाणी पिण्याचेही काही तोटे (Hot Water Side Effects) आहेत? बर्‍याच लोकांना याची माहिती नसते, यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्यास सुरवात होते. गरम पाण्यामुळे कोणते नुकसान होतात, त्याबद्दल जाणून घेऊया.

तोंडात फोड येतात

हिवाळ्यात जास्त गरम पाणी पिण्यामुळे तोंडात फोड (Sore Mouth) येतात, ज्यामुळे खाण्या-पिण्यात अडथळा येतो. या व्यतिरिक्त जास्त गरम पाणी प्यायल्यामुळे जीभ भाजण्याची देखील शक्यता असते. म्हणून कोमट पाणी प्यावे.

किडनीला नुकसानदायक ठरू शकते

जास्त गरम पाणी पिल्याने किडनीचे नुकसान (Kidney Damage) होते. म्हणून, जास्त गरम पाण्या (Hot Water) चे कधीही सेवन करू नये. नेहमी हलके कोमट पाणी प्यावे.

तोंडाच्या आतील भागात होते जळजळ

बरेच लोक हिवाळ्यात खूप गरम पाणी (Hot Water) पितात. असे केल्याने ओठ आणि तोंडाच्या अंतर्गत भागामध्ये जळजळ होण्याचा धोका उद्भवतो.

एकाग्रता होते कमी

गरम पाण्याचे सेवन केल्याने एकाग्रता कमी (Decrease Concentration) होण्याची आणि शरीरात अस्वस्थतेची समस्या उद्भवते. म्हणूनच हिवाळ्यात नेहमी कोमट पाणी प्यावे.

मेंदूच्या पेशींमध्ये येते सूज

हिवाळ्यात जास्त गरम पाणी पिण्यामुळे मेंदूच्या पेशींमध्ये सूज येऊ शकते. म्हणून जास्त गरम पाण्याचे सेवन करू नये.