गावठी बंदुकीचा धाक दाखवत हॉटेल मालकास लुटले ; २ गंभीर जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई आग्रा महामार्गावरील अवधान शिवारातील जय महाकाल हॉटेल मध्ये राञी अज्ञात तेरा जणांनी प्रवेश करुन काम करणाऱ्या अजय मरसाळे, धिरज सोनार यांना मागील भांडणातील कुरापत काढुन वाद घालत गावठी बंदुक छातीवर लावून तूला मारून टाकेन धमकवत, तलवार, लोखंडी रॉडने , जबर मारहाण करुन जखमी केले. व तेथील टेबल, प्लास्टिक खुर्चीची फेकत नासधुस करण्यात आली. बाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन मोटर सायकलला लोखंडी रॉडने मारून नुकसान केले. तसेच गल्यातील रोख रक्कम तीन हजार लुटून नेत घटनास्थळाहून पोबारा केला.

या बाबत अज्ञात व्यक्तीने पोलीसांना कळवले माहिती मिळताच काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हॉटेल मधील तोडफोड झालेल्या फेकलेल्या साहित्यांची पहाणी केली. तेथे दोन जखमी अवस्थेत पडलेले होते. त्यांना अन्य लोकांच्या मदतीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी परीसरात नाकाबंदी करण्यात आली.

सोमवारी सकाळी पोलीसांकडून घटना स्थळाचा पंचनामा करण्यात आला. मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.फरार आरोपींचा पोलीस तपास घेत आहे.