पिस्तूलाचा धाक दाखवून हॉटेल लुटले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – हॉटेलमध्ये घुसून, साहित्याची तोडफोड करत, कॅमेरे फोडून, पिस्तूलाचा धाक दाखवत गल्यातील ४ हजार ६०० रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. हा प्रकार चाकण-शिक्रापूर रस्त्यावर घडला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सोन्या उर्फ स्वप्नील संजय शिंदे (२७) आणि सुनील अशोक मुंगसे (३४, दोघे रा. रासे, खेड) या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी सौरभ गोरक्षनाथ शिंदे (२१, रा. रासे) याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ याचे चाकण शिक्रापूर रस्त्यावर हॉटेल आहे. या हॉटेल मध्ये मंगळवारी दुपारी सोन्या आणि सुनील आले.

त्यांनी हॉटेल मधील साहित्याची तोडफोड केली. कॅमेरे फोडून नुकसान केले. तसेच सौरभ याला पिस्तूलाचा धाक दाखवून गल्यात असलेले ४ हजार ६०० रुपये जबरदस्तीने काढून घेऊन धूम ठोकली. चाकण पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींना अटक केली.

You might also like