हॉटेल कर्मचाऱ्याचा महिलेसमोर हस्तमैथुन करण्याचा प्रयत्न, प्रकार सीसीटीव्ही कैद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मरिन लाईन्स येथून धक्कदायक घटना घडली असून महिलेसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या एका हॉटेल कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी एका चायनीज हॉटेलमध्ये नोकरीला असल्याची माहिती मिळाली आहे. महिलेसमोर हस्तमैथुन केल्याच्या आरोपाखाली शनिवारी त्याला अटक करण्यात आली आहे. एल. टी. मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी महिला पारसी डेअरीच्या विरुद्ध दिशेला बसलेली होती. महिला तिच्या फोनवरुन बोलत असताना आरोपी तिच्याजवळ जात हस्तमैथुन करू लागला. त्याचे अश्लील वर्तन पाहून घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. ज्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. त्यांनतर महिलेने एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस तपासात घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असल्याने आरोपीची ओळख पटवण्यात आली. महिलेनेही त्याला ओळखले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

You might also like