‘या’ हॉटेलमध्ये करतात रोबोंचा वेटर म्हणून वापर !

बीजिंग : वृत्तसंस्था – प्रगत होत चाललेल्या तंत्रज्ञानामुळे अनेक नवनवीन अविष्कार होत आहे . माणसाच्या  जीवनातील रोजचे कष्टाचे कार्य हे अधिक सहज सोपे बनवण्याचे काम या प्रगत तंत्रज्ञानाने केले आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे आजपर्यंत अनेक आविष्काराची निर्मिती झाली आहे. त्यातील मोठ्ठा अविष्कार म्हणजे रोबो (यंत्र मानव) . या रोबोटचा वापर आता  चीन मधल्या हॉटेल मध्ये होताना दिसत आहे.

चीनमधील ई-कॉमर्स कंपनी ‘अलिबाबा’ने आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काम करणार्‍या रोबोंचा वेटर म्हणून वापर केला आहे. असे वेटर व हॉटेल कर्मचारी असलेले एक हॉटेल ‘अलिबाबा’कडून सुरू करण्यात आले असून त्यामध्ये चेक-इन, लाईट कंट्रोल आणि रूम सर्व्हिससारखी कामे ‘ऑटोमॅटिक’ होतील.

हे ‘फ्लायझू’ नावाचे हॉटेल पूर्व चीनमधील झेजियांग प्रांताची राजधानी हांग्जो येथे उघडण्यात आले आहे. याच ठिकाणी ‘अलिबाबा’चे मुख्यालयही आहे. हे ‘भविष्यातील हॉटेल’ असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.