‘तो’ पर्यंत पुणे शहरात हॉटेल अन् लॉजचे ‘शटर’ बंदच !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्य शासनाने राज्यातील हॉटेल, लॉज सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली असली तरी पुण्यातील हॉटेल, लॉज आणखी दोन ते तीन दिवस बंद राहणार आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.

राज्यातील हॉटेल आणि लॉज 8 जुलैपासून सुरु करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, त्याचवेळी पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्याबाबचा निर्णय महापालिका आयुक्त घेणार आहेत. परंतु पुण्याचे महापौर कोरोना बाधित आढळले असून पुणे महापालिका आयुक्त देखील मागिल दोन दिवसांपासून होम क्वारंटाईन आहेत.

त्यामुळे अद्याप शासनाच्या या निर्णयाबाबत जिल्हा प्रशासन आणि पोलीस येंत्रणेशी कोणतीही बैठक झालेली नाही. तसेच पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोणत्या अटी आणि नियमांनुसार, ही मान्यता द्यायची याबाबतीत अद्याप चर्चा झालेली नाही. त्यामुळे पुण्यात हे दोन्ही व्यवसाय सुरु कण्यासाठी दोन दिवसांनी निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी पुण्यातील हॉटेल आणि लॉज सुरु होण्याची शक्यता कमी आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like