Unlock 5.0 : राज्यातील कंन्टेंमेंट झोनमध्ये लॉकडाऊन 31 ऑक्टोबरपर्यंत वाढला ! 5 ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट आणि बार ‘या’ अटींवर सुरू होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, कोरोनातून बर्‍या होणार्‍या रूग्णांची संख्या देखील लक्षणीय आहे. राज्य आणि केंद्र सरकार व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने राज्यातील कंन्टेंमेंट झोनमध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. तर हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार हे 5 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास 50 टक्के कपॅसिटीवर परवानगी दिली आहे. म्हणजे हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बारमधील उपस्थिती ही 50 टक्के ठेवली जाणार आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडयापासून हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट लॉकडाऊनमुळं बंद होती. तेव्हापासून हॉटेल व्यावसायिकांवर मोठं संकट कोसळलं आहे. दरम्यान, आता अनलॉक 5 चालू आहे. यापुर्वी इतर काही गोष्टींची हळूहळू सुरूवात करण्यात आली होती. आज अखेर राज्य सरकारकडून हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट 50 टक्के कपॅसिटीनं उघडण्यास परवानगी देण्यात आलील आहे. 5 ऑक्टोबरपासून हॉटेल्स आणि बार 50 टक्के कपॅसिटीनं सुरू होणार आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like