HotStock | ‘या’ शेयरला Buy रेटिंग, 60% कमाईचा अंदाज, राकेश झुनझुनवाला यांचे हे फेव्हरेट स्टॉक

0
38
HotStock | yes securities sees 60 per cent upside in this favourite stock of rakesh jhunjhunwala
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – HotStock | वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता जलशुद्धीकरण क्षेत्रावर (Water Treatment Sector) जास्त भर देत आहे. अशा स्थितीत या क्षेत्रात तेजी येण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्म येस सिक्युरिटीज (YES Securities) ने गुंतवणूकदारांना VA Tech Wabag शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. (HotStock)

 

वास्तविक, येस सिक्युरिटीज VA Tech Wabag च्या व्यवसायावर बुलिश आहे आणि त्यांनी स्टॉकसाठी 391 रुपयांचे टार्गेट दिले आहे. ब्रोकरेज फर्मने ’बाय’ रेटिंग दिले आहे. मंगळवारी बीएसईवर हा शेअर 1.76% वाढीसह 248.45 रुपयांवर व्यवहार करत होता. तर त्याचे टार्गेट 391 रुपयांपेक्षा जवळपास 60 टक्के जास्त देण्यात आले आहे.

 

राकेश झुनझुनवाला यांचा फेव्हरेस्ट स्टॉक
ब्रोकरेजने 30 मे रोजी दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की कंपनीला FY22 च्या चौथ्या तिमाहीत सुमारे 3,650 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या. आणखी एक खास गोष्ट म्हणजे या कंपनीत शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची मोठी गुंतवणूक आहे. (HotStock)

 

VA Tech Wabag स्टॉक हा राकेश झुनझुनवाला यांच्या आवडत्या स्टॉकपैकी एक आहे. 31 मार्च 2022 पर्यंत राकेश झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीत 8.04 टक्के हिस्सा होता. त्याच वेळी, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) आणि म्युच्युअल फंडांची (Mutual Fund) कंपनीत 16.17 टक्के आणि 3.41 टक्के हिस्सेदारी होती.

कंपनी बद्दल
जर आपण VA Tech Wabag च्या व्यवसायावर नजर टाकली तर, कंपनीला आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 46.07 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला होता, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 46.53 कोटी रुपये होता.

 

वर्ष-दर-वर्ष आधारावर, चौथ्या तिमाहीत नफा सुमारे 1 टक्क्यांनी कमी झाला. त्याचबरोबर महसुलात (Revenue) ही घट झाली आहे. चौथ्या तिमाहीत उत्पन्न 891.86 कोटी रुपये होते, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 999.25 रुपये होते.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे.
हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केटममधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते.
त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
www.policenama.com
कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- HotStock | yes securities sees 60 per cent upside in this favourite stock of rakesh jhunjhunwala

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | आई-बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा खून, 3 आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

 

आता विना कटकट काढा PF चे पैसे, मिनिटात थेट जनरेट होईल UAN; EPFO ने दिली ही नवी सुविधा

 

Ration Without Ration Card | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! आता रेशनकार्डशिवाय मिळणार रेशन? जाणून घ्या