धक्कादायक ! छताचा पत्रा कापून दागिने लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. धुळ्यात सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरीकाच्या बंद घराच्या छताचा पत्रा कापून चोरट्याने १० हजार रुपये रोख रकमेसह संसारोपयोगी वस्तू लंपास केल्या आहेत.
याप्रकरणी भीमराव रामभाऊ अहिरराव (रा. .प्लॉट नं.26,सरस्वती कॉलनी,शिवराय नगर गजानन मंदिर वाडिभोकर) यांनी पश्चिम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, भीमराव रामभाऊ अहिरराव हे परगावी गेले होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या छतावर चढून चोरट्यांनी छतावरील पत्रा कापून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील रोख १० हजार रुपये, एक गॅस सिंलेडर, एक ईर्न्व्हटर, एक पितळी पातळे, तांब्याचा एक बंब, एक पंखा अशा वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या.

अहिरराव घरी परतले. तेव्हा कुलूप उघडुन घरात गेल्यावर पत्रा फाडलेला दिसला तेव्हा घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. अहिरराव यांनी पश्चिम पोलीस ठाणे गाठुन लेखी तक्रार दिली आहे.त्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास हवलदार व्ही.एस.ठाकूर करत आहे.