धुळे : राजीव गांधी नगरामध्ये घरफोडी, ऐवज लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर हद्दीत घरफोडीचे सत्र सुरुच आहे. साक्री रोड गुरुकुल हायस्कुल पाठिमागील घरातून अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व तीस हजार रोख रक्कम लंपास केली.

सविस्तर माहिती की, सध्या शहर पोलीस हद्दीत घरफोडीचे सत्र सुरुच आहे. जवळच असलेल्या कुमार नगर भागात हि पहाटेच्या वेळी चारचाकी गाडीतून येत गुंगीच्या स्प्रेचा मारा करत लाखो रुपयांचे दागिने लुटून नेले. त्याचा तपास लागलेला नाही.

दसऱ्याच्या दिवशीच चोरट्यांनी सोने, चांदीची व रोख रक्कम लुटून दसरा साजरा केला. बुधवारी सायंकाळी साक्रीरोड गुरुकुल हायस्कुल पाठिमागील बाजुस भरवस्तीतील घर चोरट्यांने फोडले. यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे. घराचा लाकडी दाराचा कडीकोंडा तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश करुन लोंखडी कपाट फोडुन कपाटातील आतील बाजुस डब्यात ठेवलेले दोन सोन साखळी, सोन्यांचा बाजुबंद, चांदीचे दागिने, रोख तीस हजार रुपये असा अंदाजे दिड ते तीन लाखांचा माल चोरट्यांनी चोरुन नेला.

visit : policenama.com 

 

You might also like