शिरुर शहरात घरफोडी; 30 तोळे सोने केले लंपास

शिक्रापुर : शिरुर शहरा सह तालुक्यात गेल्या काही दिवसापासून घरफोडीच्या घटना वाढत असुन शिरुर शहरातील गोलेगाव रोड येथील एका सदनिकेत चोरट्यांनी घरी कुणी नसल्याचा फायदा घेत सुमारे ३० तोळे वजनाचे एकुण ५ लाख ७० हजार ५०० हजार रुपयांचे दागिणे व ऐवज लुटुन नेल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी नबाजी ताराचंद दुर्गे यांनी शिरुर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे कोरेगाव भिमा येथे कामास असून.दि.२५ जानेवारी रोजी फिर्यादी हे कुटुंबासह ढोकसांगावी येथे गेले होते.तेथे मुक्काम केल्यानंतर दि.२६ जानेवारी रोजी फिर्यादी दुर्गे यांना कर्नाटक येथे जाण्यासाठी निघाले.पुण्याजवळ प्रवासात असताना त्यांना घराचे कुलुप व सेफ्टी डोअर कुणीतरी तोडले असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तत्काळ शिरुर येथे घरी येउन पाहिले असता,घराचे सेफ्टी डोअर व कुलुप तुटले असल्याचे दिसले तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त असल्याचे आढळुन आले.या वेळी त्यांनी अधिक घरात पाहणी केली असता झालेल्या चोरीत ८ तोळे वजनाचे एक लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुञ,एक लाख रुपये किंमतीचे ५ तोळे वजनाचे सोन्याचे मनगट पट्टी,चार तोळे वजनाचे ८० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मनगट पट्टी,तीन तोळे वजनाच्या ६० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या,एक तोळे वजनाचे २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट, ४० हजार रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाचे कर्नफुले,१८ हजार रुपये किंमतीचे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याची कर्नफुले,३० हजार रुपये किंमतीचे दिड तोळयाचे गंठण,१० हजार रुपये किंमतीच्या कानातील बास्केट रिंगा,२० हजार रुपये किंमतीचे १ तोळयाचे कानातील छोटे टॉप्स,अर्धा तोळा वजनाचे कानातील लटकन,१ तोळ्याचे २० हजार रुपये किंमतीचे कानातील लटकते झुबे,पायातील चांदीचे २ हजार रुपये किंमतीचे पैंजन,पायातील चांदीचे जोडवे असा एकुण ५ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरुन नेला असल्याचे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी शिरुर पोलिसांनी गुन्हयाची नोंद केली असुन पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.