टाकळी विंचूर येथे साडे तीन लाखाची घरफोडी

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – टाकळी विंचूर येथील एका घराच्या दरवाजाच्या फटीतून हात टाकत आतील कडी कापून अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रोखीसह तीन लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना आज  घडली आहे. लासलगाव पोलीस ठाणे हद्दित वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की नामदेव नारायण पठारे राहणार टाकळी विंचुर यांचे घराचा दरवाजा आतील कडी कापून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील वरच्या मजल्या च्या खोलीत पत्र्याची पेटी व पत्र्याचा डब्यात ठेवलेली तीन तोळे वजनाची सोन्याची पट्टी पोत, अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत, दीड तोळे तोडे वजनाची मण्याची पोत, साडेतीन तोळ्याचे गाठले, दोन सोन्याचे ओमपान, दोन बाळ्या, चांदीचे दोन शिक्के, दोन पायतील जोडवे, चांदीच्या साखळ्या आणि ३० हजार रोखीसह असा एकून तीन लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून  नेल्याची  घटना घडल्याने टाकळी विंचुर व लासलगाव परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये दर रविवारी आठवडे बाजारातून मोबाईल चोरी,पाकीटमारी, मोटर सायकल चोरी, मोठी वाहने चोरीचा सरास प्रकार, बस ने प्रवास करत असताना महिलांच्या पर्सचोरी असे अनेक प्रकार लासलगाव व परिसरामध्ये घडत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आशिया खंडातील कांद्यासाठी लासलगाव हे प्रसिद्ध बाजारपेठ असल्याने परिसरातील 100 हून अधिक गावातील नागरिक हे कांदा विक्रीसाठी येत असतात सध्या कांद्याला चांगले बाजार भाव असल्यामुळे कांदा विक्रीच्या आलेल्या पैशातून घरगुती गरजे सह दुष्काळी परिस्थितिमध्ये अडचणीच्या काळात बँकांमध्ये गहाण ठेवलेले सोने सोडवले जात असल्याचा फायदा चोरटे घेत आहे. वाढत्या चोरीच्या घटना पाहता पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. लासलगांव पोलिस तपास सुरू आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/