थेऊर मध्ये पुन्हा घरफोडी, गावकरी वैतागले

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन – थेऊर (ता.हवेली) येथे घरफोडीच्या घटनेत 58 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून याविषयी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थेऊर येथील सखाराम नगर परिसरात राहणाऱ्या राजश्री लटके यांच्या घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटात असलेले दागिने पळविले. यामध्ये गळ्यात घालावयाचे गंठण षटकोणी मन्याची माळ व कानातील वेल असा एकुण 58 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

थेऊर मध्ये अलिकडे घरफोडीचे प्रमाण वाढले आहे यावर प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. एक महिन्यापूर्वी अशाच घरफोडीच्या घटना घडल्या होत्या त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या गावात चोरीच्या भितीमुळे अनेकजण रात्री गस्त घालताना दिसतात. लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांशी बोलून यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. गावात ग्रामसुरक्षा दलाची उभारणी करण्यात येईल असे सांगितले. परंतु आज पर्यंत ते अस्तित्वात आल्याचे दिसत नाही.

You might also like