House Burglary In Pune | पुणे शहरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरुच, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, टेम्पोसह 12 लाखांचा मुद्देमाल लंपास

कोथरुड, सिंहगड, चतु:श्रृंगी, खडकी, वानवडी, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – House Burglary In Pune | पुणे शहरामध्ये घरफोडी आणि चोरीचे सत्र सुरुच आहे. बुधवारी (दि.10) शहरातील विविध पोलीस ठाण्यात चोरीच्या सात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लॅपटॉप, टेम्पोसह 11 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(House Burglary In Pune)

वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीतील हांडेवडी रोडवर असलेल्या फिलेशिया सोसायटीतील बंद फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरुमधील कपाटात ठेवलेले चार लाख 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार सोमवारी (दि.8) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला आहे. याप्रकरणी मनमोहन तुकाराम गिते (वय-51 रा. हांडेवाडी रोड, पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चोरीच्या घटना अन् गेलेला मुद्देमाल

  • कोथरुड पोलीस स्टेशनच्या (Kothrud Police Station) हद्दीतील महात्मा सोसायटीमधील फ्लॅट मधून चोरट्यांनी 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी (दि.9) रात्री आठ वाजता उघडकीस आला.
  • सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीतील एलांझा हायर सोसायटी मधील घरातून एक लाख 85 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, कपडे चोरून नेले. याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन सासू व सासरे यांच्या गुन्हा दाखल केला आहे.
  • स्लायडिंग खिडकीतून घरात प्रवेश करुन चोरट्याने घरातील 20 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरुन नेला. हा प्रकार सोमवारी (दि.8) सकाळी दहा वाजता उघडकीस आला. ही घटना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धिविनायक सोसायटी, नऱ्हे येथे घडली.
  • बाणेर येथील पॅन कार्ड क्लब रोडवर (Pan Card Club Road, Baner) पार्क केलेला 50 हजार रुपये किमतीचा टेम्पो चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रेंजहिल्स खडकी (Range Hills Khadki) येथील मिलट्री कॅन्टीन जवळून 10 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत खडकी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच मांजरी येतील पेट्रोल पंपावरुन चोरट्यांनी 20 हजार रुपये किमीतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 4 एप्रिल रोजी उघडकीस आला असून हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Murder | पिंपरी : नशेत तरुणीसोबत लैंगिक अत्याचार, मानलेल्या भावाने तरुणाचा डोक्यात विट घालून केला खून

Sanjay Raut To Vishwajeet Kadam | ”सांगलीत जातीयवादी शक्ती वाढू लागल्यात, तिथे ठाकरे गटाचा उमेदवार आवश्यक”, राऊतांनी विश्वजीत कदमांना समजावले