इंदापूरात मध्यरात्रीला घर पेटविले

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर नजिक माळवाडी नंबर दोन येथील पाटील बंगल्याजवळ राजेंद्र तुकाराम राऊत यांचा बंगला आहे. काल दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास राऊत कुटूंबीय झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने बंगल्याच्या हॉलच्या खिडकीच्या काचा उघडून आग लावली. हे दृश्य राजेंद्र राऊत यांनी स्वतः पाहिले व तात्काळ त्यांनी शेजारच्या लोंकाना फोन करून बोलावून घेतले. जमलेल्या जमावाने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला दरम्यान नगरपालिकेच्या अग्निबंबाला बोलावण्यात आले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली.

अग्निशमन गाडी येइपर्यंत आगीमध्ये स्वयंपाक घर पूर्ण जळून खाक झाले होते. तसेच हॉल मधील सोफासेट एलईडी टीव्ही, फर्निचर, पिओपी छत आणि पंखा आदी वस्तु जळाल्या. प्राथमिक अंदाजानुसार आठ लाख रुपयांचे प्रापंचिक व इतर साहित्याचे नुकसान झाल्याची फिर्याद इंदापूर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास इंदापूर पोलिस करित आहेत.

Visit : Policenama.com