पुण्यातील ‘त्या’ १०० वर्ष जुन्या वाड्याची भिंत कोसळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रविवार पेठ पोलीस चौकीच्या पाठीमागे असलेल्या सुमारे १०० वर्ष जुन्या वाड्याची भिंत आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. वाडा रिकामा असल्याने सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

रविवार पेठेतील तांबोळी मशिदीच्या जवळ संजय पासलकर यांचा वाडा आहे. या वाड्यातील एका बाजूला कोणी रहात नाही. सुमारे १०० वर्षापूर्वीचा हा वाडा असल्याचे सांगितले जाते. या वाड्याच्या समोरील रस्त्याचे काम सुरु आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वाड्याच्या एका बाजूची भिंत अचानक कोसळली. भिंत कोसळल्याने मोठा धुराळा उडाला होता. भिंतीचा मबला दुकानासमोर पडला. सुदैवाने दुकाने बंद असल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.