House Rent Allowance | घर मालकाकडे नसेल पॅनकार्ड तरी सुद्धा मिळवू शकता HRA वर टॅक्स सवलत; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – House Rent Allowance | जर तुम्ही नोकरदार कर्मचारी आहात आणि भाड्याच्या घरात राहात असाल तर तुम्हाला हाऊस रेंट अलाऊन्स म्हणजे घरभाडे भत्ता (HRA) आवश्य मिळत असणार. घरभाडे भत्त्यावर (House Rent Allowance) तुम्ही इन्कम टॅक्स सूट (Tax Rebate) चा लाभ मिळवू शकता. HRA वर सूट इन्कम टॅक्सच्या सेक्शन 10 (13अ) च्या अंतर्गत मिळते. जे लोक स्वत:च्या घरात राहतात त्यांना मिळणार्‍या एचआरएवर टॅक्स लागतो.

 

इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर-ITR) भरताना तुम्ही एचआरएवर टॅक्स सवलतीचा दावा करू शकता. घरभाडे पावती जमा केल्यानंतर तुमच्या वेतनावर HRA टॅक्सवर सूट मिळते. तुम्ही House Rent Allowance चा पूर्ण किंवा आशिंक लाभ घेऊ शकता.

 

HRA वर टॅक्स सूट मिळवण्यासाठी घरमालकाचा पॅन नंबर सुद्धा द्यावा लागतो. कारण भाड्याचे घर हे घरमालकाचे उत्पन्नाचे साधन असते.

 

अनेकदा असे होते की, घरमालक आपला पॅन नंबर देण्यासाठी तयार होत नाही. किंवा घरमालकाकडे पॅनकार्ड नसते. अशावेळी घरमालकाच्या पॅनकार्डशिवाय तुम्ही टॅक्स सवलतीचा फायदा घेऊ शकत नाही. टॅक्सेबल उत्पन्नाची गणना एचआरएच्या एकुण उत्पन्नातून वजा करून केली जाते.

 

येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, जर तुमचे वार्षिक घरभाडे एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे
तर एचआरए टॅक्स सवलतीचा लाभ घेण्यासाठी घरमालकाचे PAN Card आवश्य द्यावे लागेल.

 

जर तुमच्या घरमालकाकडे पॅनकार्ड नसेल तर घर मालकाचे नाव आणि
पत्त्यासह तुम्हाला घरमालकाकडे पॅनकार्ड उपलब्ध नसल्याचे डिक्लरेशन द्यावे लागेल.
जर तुमचे घरभाडे वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे
तर तुमच्या भाडेपावतीसह घरमालकाचा पॅन नंबर द्यावा लागणार नाही.

 

Web Title :- House Rent Allowance | get tax rebate on house rent allowance without landlord pan card

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा