महिला ‘बिनधास्त’ अंधोळ करताना नोकरानं काढला व्हिडीओ, धमकी देवून केले अश्लील चाळे अन् केली ‘सेक्स’ची मागणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  देशाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा साडे चार लाखाच्या वर गेला आहे. एकिकडे राज्य कोरोना महामारीचा एकजूटीने सामना करत असताना महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. नगापूरमध्ये महिला अत्याचाराची एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नागपूरमधील अजनी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचा आंघोळ करताना व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत नोकरानेच तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांत नोकराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. चेतन खडतकर असे आरोपीचे नाव आहे.

संबंधित महिलेचे पती सीए असून चेतन हा त्यांच्याकडे काम करतो. घरातच कार्यालय असल्याने चेतन याचा घरात सतत वावर असायचा. याच दरम्यान तो पीडित महिलेवर एकतर्फी प्रेम करू लागला. नोकर असल्याने महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. 6 जुलै रोजी महिला बाथरूममध्ये आंघोळ करत होती. याच दरम्यान आरोपी चेतन याने महिलेचा मोबाईलद्वारे व्हिडीओ काढला, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
एवढेच नाही तर आरोपीने व्हिडीओ काढल्यानंतर महिलेच्या घरातीलच संगणकावर धमकीचे पत्रही तयार केले. हे पत्र पिडित महिलेला पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. सुरुवातीला तिचे चेतन याच्या काही मागण्या मान्य केल्या तो महिलेशी अश्लील चाळे करायला लागला. यानंतर त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिने त्यास नकार दिला. महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने आंघोळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर महिलेने सर्व प्रकार पतीला सांगितला. यानंतर पतीसह पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like