कर्वेनगरात भरदिवसा घर फोडून 10 लाखांचा ऐवज चोरीला; शहरातील घरफोड्यांचे सत्र थांबेना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, कर्वेनगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील परदेशी चलन तसेच सोन्याची बिस्किटे असा ९ लाख ४० हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. सततच्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

याप्रकरणी लिना दोभाडा (वय ४४,रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कर्वेनगर) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोभाडा दोन दिवसांपूर्वी दुपारी दोनच्या सुमारास सदनिका बंद करून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाट उचकटून चोरट्यांनी कपाटातील परदेशी चलन आणि सोन्याची बिस्किटे असा ९ लाख ४० हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर दोभाडा यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक एस. के. गोरे तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/