‘HouseFull – 4’ मध्ये अक्षय कुमारसोबत मस्ती करणार राणा डग्गुबाती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमार वर्षाला जवळपास चार ते पाच चित्रपट घेऊन आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत असतो. आगामी काळात देखील त्याचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामध्ये हाउसफुल 4 हा महत्वाच्या चित्रपटाचा समावेश आहे. यामध्ये प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज असून कव्वाली सीक्वेंस असून यामध्ये अक्षय कुमार बरोबर राणा डग्गुबाती दिसणार आहे.

राणा डग्गुबाती याने बाहुबलीमध्ये भल्लाळदेव हे एक यादगार पात्र रंगवले होते. त्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. मात्र हाउसफुल 4 या चित्रपटात त्याची नक्की काय भूमिका आहे याचा मात्र खुलासा झालेला नाही. मात्र तो अक्षय कुमारबरोबर शानदार कव्वाली करताना दिसून येणार आहे. या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्या फ्रेंचायजीचा हा चौथा चित्रपट असून हा चित्रपट दिवाळीमध्ये म्हणजेच 26 ऑक्टॉबर 2019 या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, हाउसफुल 4 या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल त्याचबरोबर कृति सॅनन , कृति खरबंदा आणि पूजा हेगडे यांच्या भूमिका असून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like