दिवाळीपूर्वी बॉलिवूड ‘मेगाक्लॅशसाठी सज्ज, जाणून घ्या कोण मारणार बॉक्स ऑफिसवर बाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान प्रेक्षक चित्रपट पाहण्याला पसंती देतात. हे समीकरण लक्षात घेऊन निर्मात्यांचा सुट्टीच्या आधी चित्रपट प्रदर्शित व्हावा याकडे कल असतो. त्यामुळे दिवाळीपूर्वीच बॉलिवूड ‘मेगाक्लॅशसाठी सज्ज आहे. सांड की आँख , मेड इन चाइना आणि हाऊसफुल-4 हे 3 चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच वेळी प्रदर्शित होणार आहेत.

चित्रपट निर्मात्यांना त्यांचे चित्रपट दिवाळीपूर्वी सुमारे रिलीज करायचे आहेत जेणेकरुन ते अधिक व्यवसाय करू शकतील. मात्र, या स्पर्धेत फायद्यापेक्षा बर्‍याच वेळा अधिक नुकसान होते. या दिवाळीत 3 चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच वेळी प्रदर्शित होणार आहेत.

यात भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नूचा चित्रपट ‘सांड की आँख’, ‘राजकुमार राव’ आणि ‘मौनी रॉय’ यांचा ‘मेड इन चाइना’ आणि अक्षय-बॉबी आणि रितेश देशमुख यांचा ‘हाऊसफुल’ यांचा समावेश आहे. तज्ञांच्या मते या तीन चित्रपटाच्या स्पर्धेत हाऊसफुल 4 या स्पर्धेत बाजी मारणार आहे. मेड इन चायना दुसऱ्या क्रमांकावर असेल तर सांड की आँख तिसर्‍या क्रमांकावर राहील.

कोणता चित्रपट किती कमाई करेल ?
सुपर सिनेमाच्या आकडेवारीनुसार, हाउसफुल 4 पहिल्या दिवशी सुमारे 24 ते 25 कोटींची कमाई करेल. मेड इन चायनाला पहिल्याच दिवशी 5 ते 6 कोटी मिळण्याची अपेक्षा आहे. सांड की आँख पहिल्याच दिवशी सुमारे दीड ते दोन कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. मात्र हे केवळ अंदाज आहेत.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like