पुणेकरांनो लक्ष द्या ! घरगुती सुका कचरा आता दिवसाआड जमा केला जणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   पुणे महापालिकेनं सोमवारपासून घरगुती सुका कचरा एका दिवसाआड गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. घरातील कचऱ्याचं औला आणि सुका असं वर्गीकरण करून तो कचरा वेचकांकडे सुपूर्त करण्याची सवय नागरिकांना लागावी यासाठी महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. घरगुती ओला कचरा मात्र रोज उचलण्यात येणार आहे.

जर नागरिकांना कचऱ्याचं वर्गीकरण केलं नाही तर त्यांना दंडही भरावा लागणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी याबाबत माहिती दिली आहे. यापुढे ओला व सुका कचरा वेगळा न करता मिश्र कचरा देणाऱ्या नागरिकांना पहिल्या वेळी 60 रुपये, दुसऱ्या वेळी 120 रुपये व त्या पुढील वेळेस 180 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्या अनुशंगानं वॉर्ड ऑफिस स्तरावर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

वारंवार सूचना करूनही नागरिक ओला आणि सुका कचरा एकत्रच देतात. यामुळं त्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना अडचण येते. घरगुती कचऱ्याचं घरात वर्गीकरण होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आता सुका कचरा एक दिवसाआड संकलित केला जाणार आहे. यानुसार आता वार्डनिहाय कचरा संकलनाचे वेळापत्रक तयार केले जाणार आहे अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख माधव जगताप यांनी दिली आहे.

मोठ्या सोसायट्यांना 8 दिवसांची मुदत

शहरात रोज शंभर किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या तसेच 50 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण संस्था, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, हॉटेल्स रेस्टॉरंट यांनी ओला कचरा आपल्याच परिसरात प्रक्रिया करून जिरवणे बंधनकारक आहे. मात्र अद्यापही अनेक आस्थापनांनी याबाबत कार्यवाही केलेली नाही किंवा प्रक्रिया प्रकल्पही उभारले नाहीत. त्यामुळं अशा सर्व आस्थापनांना महापालिकेनं पुढील 8 दिवसात प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची सूचना दिली आहे. त्यानंतर तेथील ओला कचरा उलण्यात येणार नसल्याचं सांगितलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like