‘कोरोना’मुळे 60 टक्के लोकांचे ‘उत्पन्न’ घटले, लोकांची ‘खर्च’ करण्याची पद्धत बदलली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे कोट्यावधींच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. लॉकडाऊनची वेळ जसजशी वाढत आहे तसतसे लोकांच्या अडचणी देखील वाढत आहेत. अशा परिस्थितीत ‘निल्सन’चे सर्वेक्षण समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार कोरोनामुळे 60 टक्के घरगुती उत्पन्नावर परिणाम झाला आहे. हा अहवाल 12 शहरांमध्ये पाहणी केल्यानंतर तयार करण्यात आला आहे. सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की, 10 पैकी 8 जणांना मार्च-जून महिन्यात हवाई मार्गाने प्रवास करायचा होता तसा प्लान ते बनवत होते किंवा एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत होते. सर्वेक्षणातील केवळ 28 टक्के लोकांनी असे सांगितले की, लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर ते आपण आखलेल्या प्लानमध्ये खर्च करणार आहेत. तर बऱ्याच लोकांनी आखलेले प्लान रद्द केले आहेत.

खर्च करण्याचा मार्ग बदलला
कोरोनामुळे लोकाच्या खर्च करण्याच्या पद्धतीमध्ये काय बदल झाला आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. कोरोनापूर्वी लोक त्यांच्या कमाईच्या 20 टक्के रक्कमेची गुंतवणूक करत होते. कोरोना दरम्यान यामध्ये घट झाली असून 16 टक्के रक्कमेची गुंतवणूक केली जात आहे. कोरोनापूर्वी लोक त्यांच्या उत्पन्नातील 25 टक्के रक्कम रोख किंवा बँकेत ठेवत असत आता त्यात वाढ होऊन 27 टक्के झाली आहे.

FMCG उत्पादनांच्या विक्रीत 34 टक्क्यांनी घट
अहवालानुसार, एप्रिलमध्ये फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) च्या विक्रीत 34 टक्क्यांनी घट झाली आहे. सर्वात वाईट परिणाम किराणा दुकानांवर झाला आहे. जी गल्ली मोहल्ल्यामध्ये चालू होती. देशाच्या जीडीपीमध्ये उपभोगाचा हिस्सा 60 टक्क्यांहून अधिक आहे आणि कोरोनामुळे उपभोगाती हिस्स्यात घट झाली आहे.