कामवाल्या बाईने दिले दीड वर्षाच्या मुलीला ‘चटके’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सांभाळण्यासाठी दिलेल्या दीड वर्षाच्या मुलीला कामवाल्या बाईने दोन्ही हाताला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार जुन्या सांगवीत उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सांगवी पोलिसांनी बाल न्याय अधिनियमानुसार कामवाली बाई जनाबाई पवार (रा. ममतानगर, जुनी सांगवी) हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. जनाबाई पवार या त्यांचे घरकाम करतात. ही महिला खासगी नोकरी करते. त्यामुळे नोकरीवर जाण्यापूर्वी त्या आपल्या दीड वर्षाच्या मुलीला तिच्याकडे सांभाळण्यासाठी ठेवतात.

२० जुलै रोजी त्यांनी असेच तिला दुपारी दीड वाजता पवार यांच्याकडे दिले. त्यानंतर त्यात रात्री १० वाजता तिला घेऊन गेल्या. या दरम्यान या दीड वर्षाच्या मुलीने त्रास दिल्यामुळे चिडून जाऊन जनाबाई पवार यांनी रागाच्या भरात या दीड वर्षाच्या मुलीच्या दोन्ही हाताला चटके दिले. हा प्रकार या महिलेला उशीरा लक्षात आला. त्यानंतर त्यांनी जनाबाई पवार हिला मुलीला कशामुळे भाजले असे विचारले असता तिने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने शेवटी या सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –