Coronaviurs Lockdown : ‘लॉकडाऊन’ दरम्यान टॉप ‘ट्रेंड’ मध्ये आलं ‘Houseparty’ ऍप, आता युजर्स का करत आहेत डिलीट ?

पोलिसनामा ऑनलाइन – पूर्ण देशभरात लॉकडाऊनमुळे घरात राहणाऱ्यांमध्ये ‘houseparty’ नावाचा ऍप वेगाने व्हायरल होत आहे. तरुणांमध्ये या ऍपची क्रेझ इतकी वाढली की iOS आणि अँड्रॉइड दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर हा टॉप ट्रेंडींग फ्री ऍप्सच्या लिस्टमध्ये आला आहे. सोमवारी दुपारपर्यंत या ऍपद्वारे सगळे लोकं आपली घरातील लोकांशी, मित्रांशी आरामात बोलत होते. सगळं ठीक असताना अचानक संध्याकाळी काही युजर्स तक्रार करू लागले. युजर्सचे म्हणणे आहे की, हॅकर्स या ऍपद्वारे त्यांच्या फोनमधून संवेदनशील माहिती वापरत आहेत.

याशिवाय त्यांचे हेही म्हणणे होते की, हॅकर्स फोनचे बाकी ऍप जसे इंस्टाग्राम, स्पॉटिफायसोबतही छेडछाड करत आहेत. काही युजर्सने पैसे चोरी होण्याची तक्रार केली आहे. ट्विटरवर ‘deletehouseparty’ हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आणि हळूहळू लोकांनी या ऍपला डिलीट करण्यास सुरु केले.

याला नकार देत houseparty ने स्पष्टीकरण दिले की, हा ऍप पूर्णपणे सुरक्षित असून युजर्सचा डेटा चोरी होण्याची भीती नसली पाहिजे. पुढे म्हटले की, हाऊसपार्टीचे सगळे अकाउंट सुरक्षित आहेत. आणि वचन दिले की, हा ऍप दुसऱ्या वेबसाइटसाठी कधीही युजर्सचा पासवर्ड चोरणार नाही.

तुम्हीही डिलीट केला पाहिजे का Houseparty ऍप?
मानले जात आहे की, हाऊसपार्टीने जे स्पष्टीकरण दिले ते शक्य आहे आणि ‘delete houseparty’ फ्रॉड पेमेंट मोहीम असू शकते. ऍपचे म्हणणे आहे की, याप्रकारे उपक्रम करणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश केल्यावर १ मिलियन बक्षीस दिले जाईल.

सोबतच शक्य नाही की, पॉप्युलर बॅटल गेम फोर्टनाइट क्रिएटर एपिक गेम्सची पेरेंट कंपनी हाऊसपार्टीमध्ये प्रायव्हसीची अडचण येईल. जर प्रायव्हसीमध्ये काही अडचण आली तर कंपनी त्याला फिक्स करण्याबाबत नक्की सांगेल.