घर घ्यायचंय… ‘येथे’ केवळ ७८ रुपयात घ्या टोलेजंग घर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका बाजूला जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना एका युरोमध्ये घर काय, मातीचा कणही येणार नाही. पण जगात एका ठिकणी तुम्ही एक युरो म्हणजेच ७८ रुपयांमध्ये संपूर्ण घर व विकत घेऊ शकता. इटलीतील संबुका बेटावर तुम्हाला या किमतीत घर मिळू शकते. हे खूप सुंदर बेट आहे. या बेटांवरील लोकांनी आपली घरे विकायला काढली आहेत. या घरांची मूळ किंमत हि १ युरो म्हणजेच केवळ ७८ रुपये ३७ पैसे इतकी होती. इटली येथे सिसिका येथील संबुका बेटावर ही घरे आहेत. या बेटावर राहणाऱ्या लोकांकडे उदरर्निवाहाचे साधन नसल्याने, त्यांना त्यांची घरं विकावी लागत आहेत. पूर्वी या बेटावर मोठ्या प्रमाणात लोकं राहत होती.

१९६८ च्या भूकंपानंतर येथील परिस्थिती बदलत गेली आणि हळूहळू येथील लोकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली. आता या बेटावर खूप कमी प्रमाणात लोकं शिल्लक आहेत. जानेवारी महिन्यात या घरांच्या विक्रीसाठी जाहिरात लावण्यात आली आणि या घरांची मूळ किमंत १ युरो इतकी ठेवण्यात आली. या घरांना विकत घेण्यासाठी जगभरातील लोकांनी प्रयत्न केले. इस्रायल, रशिया, ब्रिटन आणि चिलीच्या लोकांनी या घरांसाठी बोली लावली. या बेटावर सर्वात स्वस्त घर हे १००० युरो म्हणजेच ७८००० रुपयांना विकले गेले आणि सर्वात महागडे घर २५ हजार युरो म्हणजेच २० लाख रुपयांमध्ये विकलं गेलं.

डिस्कवरीने देखील इथे घेतले घर
डिस्कवरी चॅनेलनेही या बेटावर घरं विकत घेतली आहेत. डिस्कवरी या संबुका बेटावर राहणाऱ्या लोकांवर एक कार्यक्रम करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी ही घरं विकत घेण्यात आली आहेत. संबुका बेटावरील लोकांच्या समस्या त्यांची परिस्थितीशी झुंज देण्याचा प्रवास या कार्यक्रमात दाखवण्यात येणार आहे.