लॉकडाऊनचा परिणाम : एप्रिल ते जून दरम्यान देशातील टॉपच्या 8 शहरांमधील घरांच्या विक्रीत 79 % घट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी देशभर लागू केलेल्या लॉकडाऊनचा परिणाम घरांच्या विक्रीवरही दिसून येत आहे. लॉकडाऊनमध्ये घरांची विक्री कमी झाली आहे. एप्रिल ते जून या काळात आठ प्रमुख शहरांमधील घरांची विक्री 79 टक्क्यांनी घटून 19,038 युनिट झाली आहे. दरम्यान, कोरोना नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊनमुळे मागणीवर तीव्र परिणाम झाला आहे. रिअल इस्टेट ब्रोकरेज फर्म प्रॉपटाइगरने मंगळवारी ही माहिती दिली.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपला नवीन अहवाल प्रसिद्ध करताना प्रॉपटायगरने सांगितले की, यावर्षी जानेवारी-जूनमध्ये आठ शहरांमधील निवासी मालमत्तांची विक्री 52 टक्क्यांनी घसरून 88,593 युनिटवर आली आहे. अहवालात उल्लेख केलेल्या शहरांत अहमदाबाद, बेंगलुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली-एनसीआर (नोएडा, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, गाझियाबाद आणि फरीदाबाद), एमएमआर (मुंबई, नवी मुंबई, ठाणे) आणि पुणे यांचा समावेश आहे.

आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून 2020 या कालावधीत हैदराबादमध्ये घरांची विक्री 86 टक्क्यांनी घसरून 1,099 यूनिटवर गेली आहे, जी मागील वर्षातील याच कालावधीत 8,122 युनिट होती. मुंबईच्या 2020 च्या दुसऱ्या तिमाहीत 85 टक्क्यांनी घट होऊन ते 4,559 युनिट आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत ते 29,635 युनिट्स होते. यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत अहमदाबादमधील विक्री 83 टक्क्यांनी घसरून 1,181 युनिट आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 6,784 युनिटची विक्री झाली होती.

नॅशनल कॅपिटल रीजन ( NCR) च्या एप्रिल ते जून महिन्यात 1,886 युनिटच्या विक्रीत 81 टक्क्यांनी घट नोंदली गेली, जी एका वर्षापूर्वी 9,759 युनिट होती. कोलकातामधील विक्री 5268 युनिट्सच्या तुलनेत 75 टक्क्यांनी घसरून 1,317 युनिटची नोंद झाली आहे, तर पुण्याची मागणी 74 टक्क्यांनी घसरून 4,908 युनिट झाली आहे. बेंगळुरूच्या 10,251 युनिटपैकी 2,776 युनिटच्या विक्रीत 73 टक्क्यांनी घट झाली आहे, तर चेन्नईच्या 4,364 युनिटपैकी 1,312 युनिटवर 70 टक्क्यांनी घट झाली आहे.