Housing Sales Report | 2021 मध्ये पुण्यासह देशातील ‘या’ 7 टॉप शहरांत घरांची विक्री 71% वाढली, पुण्यात 53 % वाढ; ‘एनारॉक’च्या रिपोर्टमध्ये दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Housing Sales Report | देशातील टॉप सात शहरांमध्ये घरांची विक्री 2021 मध्ये याच्या पूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत 71 टक्के वाढून 2,36,530 यूनिट्स झाली. मात्र, घरांची मागणी अजूनही प्री-कोविड स्तरापासून 10 टक्के कमी आहे. प्रॉपर्टी कन्सल्टंट कंपनी (Property Consultant Company) एनारॉक (Anarock) च्या एका रिपोर्टमध्ये असे नमूद केले आहे. यानुसार, 2020 मध्ये 1,38,350 निवासी यूनिट्स विकले होते आणि 2019 मध्ये एकुण 2,61,358 यूनिट्सची विक्री झाली होती. (Housing Sales Report)

घरांच्या विक्रीतील तेजी मागील कारणे

मुंबई (Mumbai) येथील कंपनी एनारॉकने सांगितले की, होमलोनवर (Home Loan) कमी व्याजदर, मोठी मागणी, घराच्या मालकीच्या इच्छेत वाढ आणि महाराष्ट्रासह (Maharashtra) काही राज्यांद्वारे स्टॅम्प शुल्कात कपातीसह बांधकाम व्यावसायिकांकडून (Builders) दिली जात असलेली सूट, यामुळे घरांच्या विक्रीत वाढ होत आहे.

मुंबईत 76,400 यूनिट्सची झाली विक्री

एनारॉकच्या वार्षिक आकड्यांनुसार, मुंबई महानगर क्षेत्रात (MMRDA) निवासी विक्री 2021 मध्ये 72 टक्के वाढून 76,400 यूनिट्स राहिली, जी याच्या मागील वर्षात 44,320 यूनिट्स होती.

हैद्राबादमध्ये (Hyderabad) मागील वर्षी घरांची विक्री तीन पट वाढून 25,410 यूनिट्स झाली. 2020 मध्ये हा आकडा 8,560 होता. दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi-NCR) 2021 मध्ये 73 टक्के वाढीसह 40,050 यूनिट्स विक्री, 2020 मध्ये हा आकडा 23,210 यूनिट्स होता.

पुण्यात 2021 मध्ये घरांच्या विक्रीत 53 टक्के वाढ

पुण्यात (Pune) 2021 मध्ये 53 टक्के वाढीसह 35,980 यूनिट्सची विक्री झाली. 2020 मध्ये हा आकडा 23,460 यूनिट्स होता. बेंगळुरूमध्ये (Bengaluru) 2021 मध्ये 33 टक्के वाढीसह 33,080 घरे विकली गेली. 2020 मध्ये 24,910 घरे विकली होती. (Housing Sales Report)

 

 

चेन्नईमध्ये (Chennai) 2021 मध्ये 86 टक्के वाढीसह 12,530 यूनिट्सची विक्री झाली. 2020 मध्ये हा आकडा 6,740 यूनिट्स होता. कोलकातामध्ये (Kolkata) 2021 मध्ये 13,080 यूनिट्स विकली गेली. 2020 मध्ये हा आकडा 7,150 होता.

2022 मध्ये प्री-कोविड लेव्हलवर पोहचू शकते विक्री

एनारॉकचे चेअरमन अनुज पुरी (Anuj Puri, chairman of Anarock) यांनी म्हटले की, कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी नियंत्रणात राहिले तर 2021 च्या कामगिरीच्या आधारावर म्हणत येऊ शकते की, 2022 मध्ये वाढ समाधानकारक राहिल.

मालमत्तांच्या किमतीत 5-8 टक्के वाढ शक्य

आशा व्यक्त केली जात आहे की, 2022 मध्ये विक्री प्री-कोविड स्तरावर पोहचेल.
त्यांनी म्हटले की, दबाव आणि पुरवठा साखळीशी संबंधीत मुद्द्यांमुळे मालमत्तांच्या किमतीत 5-8 टक्के वाढ होऊ शकते.

Web Title :- Housing Sales Report | housing sales jump 71 percent in 2021 in top 7 cities sales dip 10 pc from 2019 pre covid level anarock

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

India’s Top 10 Companies | ‘या’ आहेत भारतातील टॉप 10 कंपन्या, 9 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी उसळी

Palghar Crime | आश्रम शाळेतील 12 वर्षाच्या मुलीला कामास बोलावून अधीक्षकाचं विकृत कृत्य, महिला कर्मचाऱ्याने पाहिलं अन्…

Dry Fruits-Immunity | ओमीक्रोनपासून वाचण्यासाठी वाढवा इम्यूनिटी, हे 3 ड्राय फ्रूट्स आहेत उपयोगी