Immunity Tips : इम्यूनिटी कमजोर होण्याची कारणं आली समोर, ‘या’ गोष्टींपासून दूर राहा अन् संसर्गापासून करा बचाव

सुरुवातीपासूनच कोरोना दूर ठेवायचे असेल तर रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी अनेक लोक घरगुती उपायांसह इतर उपायांचा अवलंब करत आहेत. या प्रतिकार शक्तीमुळे शरीर स्वतःला बर्‍याच रोगांपासून संरक्षण करण्यास सक्षम असते. कोरोना सारख्या आजारावर अजूनपर्यंत कोणतेही उपाय सापडले नाहीत साहजिकच त्याला रोखण्यासाठी प्रतिकार शक्तीच कमी येत आहे. त्यामुळे हि प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी न्यूरोलॉजिस्ट डॉ मनीष चौहान आणि एम्सचे डॉ. अय्याशी यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी काय करायला हवं ?
सध्या लोकांचे लक्ष रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यावर आहे. यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आणि प्रोटीनचे सेवन केले पाहिजे. त्याचबरोबर सर्व लोकांनी श्वास व्यायाम करणे आवश्यक आहे. फुफ्फुसांना बळकटी देण्याच्या व्यायामाकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होण्यामागील कारण ?
आपली प्रतिकार शक्ती कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे जीवनशैलीच्या समस्यांसह उच्च चरबीयुक्त आहार. शरीर हायड्रेशन राखणे फार महत्वाचे आहे, आवश्यकतेनुसार पाणी आणि ओआरएस ठेवणे आवश्यक आहे. शरीरात रोग प्रतिकारशक्ती एका दिवसात तयार होत नाही, म्हणून या उपायांचा सतत वापर केला पाहिजे.

रिपोर्ट येईपर्यंत कशी काळजी घ्यायची ?
कोरोना तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल येण्यास काही काळ लागत आहे. अशावेळी या कालावधीतही काही बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. लक्षणांनुसार डॉक्टरांशी संपर्क साधणे आणि त्वरित औषधे सुरू करणे आवश्यक आहे. आपल्याला श्वास घेण्यात त्रास होत असल्यास, आपले डॉक्टर आवश्यकतेनुसार सीटी स्कॅन करण्याची शिफारस करू शकतात. हे छातीत पॅच तयार होणं सूचित करते.

रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ नये यासाठी काही गोष्टी कटाक्षाने टाळणे आवश्यक आहेत. या कोणत्या गोष्टी आहे त्या खालील प्रमाणे

सोडा वॉटर
भारतात सामान्यतः सोडा वॉटर पुजायला जाणारे पेय आहे.
सोडा पाण्याने पोटाची उष्णता थंड होते आणि ती शीतलता प्रदान करते, लोक असा विचार करतात परंतु त्यांना माहित नाही कि त्याचे अतिसेवन देखील शरीराला हानी पोहोचवू शकते. सोडा पाण्याचे नियमित सेवन केल्यास पाचन तंत्र खराब होते आणि यकृत आणि आतड्यांचे नुकसान देखील होते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. म्हणून, सोडा पाण्यापासून दूर राहणे आवश्यक आहे.

मद्यपान
शरीराची हानी अल्कोहोलमुळे होत असते. सतत सेवन केल्यास प्रतिकार शक्तीही कमी होते त्यामुळे कोरोनाकाळात तर याचे सेवन करू नये. तसे न केल्यास संसर्गाची वाढण्याची शक्यता असते. त्याचबरोबर अन्य व्याधीही उदभवू शकतात. म्हणूनच, मद्यपान न करणे चांगले आहे.

कॉफी
अनेकांना कॉफी आवडते. ते रोज सकाळी त्याचे सेवन करत असतात. त्यामुळे त्यांना ताजेतवाने वाटते. परंतु त्यात असलेल्या कॅफिन मुळे आपल्या शरीराला हानी पोहचू शकते. चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य रोगप्रतिकारक प्रणालीवर परिणाम करते, त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकते. म्हणूनच, कॉफीचे सेवन अल्प प्रमाणात करणे महत्वाचे आहे.

चहा
चहाही कॅफेनयुक्त पेय आहे. त्यामुळे त्याचेही सेवन प्रमाणात करणे आवश्यक आहे. चहाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरास हानी पोहोचते. त्यामुळे आपली प्रतिकार शक्ती मजबूत करायची असले तर चहाचे सेवन मर्यादित करावे.