पीक विम्याचे 2000 कोटी रुपये तातडीने शेतकऱ्यांना द्यावे : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलिसनम ऑनलाइन – सरसकट सर्व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा, विमा कंपन्यांसोबत सुरु असलेल्या चर्चेचे आंदोलनात रूपांतर होईल, असा इशारा ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. राज्यात तब्बल ९० लाख शेतकरी योजनेस अपात्र ठरले आहेत.

विमा कंपन्यांच्या भूमिकेमुळे पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केला.एका पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. पीक विमा योजनेची अंमलबजावणी व विमा कंपन्यांच्या कारभारावर ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पीक विम्याचे २ हजार कोटी रुपये विमा कंपन्यांकडे पडून आहेत. तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरविल्यानंतर त्यांनी ही रक्कम नफ्यात वळती केली.

उद्धव ठाकरे यांनी ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे ना की विमा कंपन्यांच्या असे ठणकावून सांगितले. शिवसेनेने आवाज उठवल्यावर दहा लाख शेतकऱ्यांना १६० कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. कंपन्यांचा नफा वगळून इतर सर्व पैसे शेतकऱ्यांना मिळायला हवेत. कंपन्या देत नसतील तर सरकारने तो पैसा परत घेऊन अन्य यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांना पोहोचवायला हवा, असे ठाकरे म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त –