आमदारकीचे राजीनामे देवुन ‘मंत्री’ बनलेल्यांबद्दल अजित पवार ‘बोलले’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजपासून राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिलीच दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये चोर चोर अशा घोषणा असतील किंवा अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलेला प्रश्न असेल, यांसारख्या प्रश्नांनी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच जेरीस आणले आहे.

अधिवेशनाच्या सुरुवातीला नवनिर्वाचित मंत्र्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष करत टीका केली. यावेळी टीका करताना ते म्हणाले कि, यातील काही जण राष्ट्रवादी किंवा काँग्रेस मधून आलेले असतानाही त्यांना थेट मंत्रिपद दिलेलं आहे. अजित पवार म्हणाले, भाजपानं स्थिर सरकार चालवण्यासाठी काही नियम-कायदे केले आहेत काय? असा सवाल देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. एखाद्या व्यक्तीने राजीनामा दिल्यानंतर त्याला ६ महिन्याच्या आत कोणत्याही सभागृहाचे सदस्य व्हावे लागते. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घेत येते का ?असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी विचारला.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारचा कुठलाही कायदा नाही, जर एखादी व्यक्ती पात्र असेल तर भारतीय संविधानानं तिला मंत्री बनण्याचा अधिकार दिला आहे. तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसला तरीही त्याला सहा महिने मंत्रीपदी राहण्याचा संविधानाने असंधिकार दिला असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. फक्त विरोधी पक्षातील कोणत्याही सदस्याला मंत्री होता येत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

दरम्यान, आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याचे पाहायला मिळून आले असताना संपूर्ण अधिवेशनात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सिने जगत –

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा