‘मी भाजपमध्ये नवीन आहे, खडसेंबद्दल काय बोलणार ?’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –   भाजपचे खासदार डॉ सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांनी एकनाथ खडसेंच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पक्षात मी नवीन आहे. मला एकच वर्ष झालं आहे. त्यमळं 40 वर्षे पक्षात असलेल्या व्यक्तीवर मी टिकाटप्पणी काय करणार अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसे हे नाराज होते. त्यांच्या जाण्यानं भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. खडसेंनी केलेल्या आरोपांवर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी त्यांच्या पक्षांतराबद्दल सावध प्रतिक्रिया दिली आहे.

सुजय विखे यांना यावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनीही अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, एकनाथ खडसे हे ज्येष्ठन नेते होते. मी भाजपमध्ये नव्हतो त्याआधीपासून ते पक्षात होते. ते गेल्यामुळं पक्षाला निश्चितच नुकसान होणार आहे. परंतु तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. मी पक्षात नवीन आहे. मला एकच वर्ष झालं आहे. त्यामुळं एक वर्ष पक्षात असणारा व्यक्ती 40 वर्षे पक्षात राहिलेल्या व्यक्तीवर टीकाटिप्पणी काय करणार असंही सुजय विखे म्हणाले आहेत.

You might also like