भारताचा पंतप्रधान फेकू कसा काय असू शकतो : राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारताचा पंतप्रधान फेकू कसा काय असू शकतो ? इंटरनेटवर भारताचा पंतप्रधान शोधलं की फेकू शब्द येतो. या माणसाने पाच वर्षात किती थापा माराव्यात असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत केला. मोदी शहा जोडी असं वागली नसती. तर मला त्यांचा विरोध करण्याची गरज पडली नसती. असंही ते म्हणाले.

राज ठाकरे लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या कारभाराचा सातबारा मांडण्यासाठी राज्यभरात १० सभा घेणार आहेत.

हे आहेत त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे –

– कॉंग्रेसच्या सगळ्या जुन्या योजनांची नावं बदलून कारभार हाकला.

बेसिक सेव्हींग बँक डीपॉजीट अकाउंट – जनधन योजना

नॅशनल गर्ल सेव – बेटी बचाओ बेटी पढाओ

राजीव आवास योजना – सरदार पटेल आवास योजना

इंदिरा आवास योजना –

– कॉंग्रेसला केवळ राजीव गांधी इंदिरा गांधी यांचीच नावं योजनांसाठी मिळतात का? भाजपलाही याच माणसांची नावं मिळतात का?

– इटलीत गेलो विमानतळाचं नाव लिओनार्दो दा विंची मोठा शिल्पकार, परंतु भारतात चित्रकार, आर्किटेक्ट, शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांच्यातल्या त्यांच्यात तिकडंच खेळत राहता.

– आधार कार्डावर पंतप्रधान होण्याआधी काय म्हणाले. आणि आता काय म्हणाले. हे तुम्हीच पहा.

– आधारमुळे बाहेरचे लोक आत घुसतील. देशाला धोका निर्माण होईल असं मोदी म्हणाले होते. मात्र आता सत्तेत आल्यावर तीच योजना परत का आणली. याचं उत्तर मोदींनी द्यावं.

– नमामी गंगे योजनेचे २० हजार कोटी रुपये कुठे गेले माहित नाही. अग्रवाल तेथे १११ दिवस उपोषणाला बसले होते. त्यांचा मृत्यू झाला.

– नोटबंदी आणि जीएसटीनंतर साडेचार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या.

– हीच गोष्ट हिटलरने केली होती. सगळ्या गोष्टी बंद केल्या होत्या. मोदींची हिटलरशी तुलना.

– वृत्तपत्र, वाहिन्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे.

– निवडणूकीच्या वेळी युद्ध सदृश्य स्थिती निर्माण केली. कॉंग्रेसच्या काळात विचारत होते. सीमा आपल्या आहेत. शस्त्र येतात कुठून मग हाच प्रश्न तुम्हाला आहे. पुलवामा हल्ल्यातील आरडीएक्स आलं कुठून

– पाकिस्तानच्या मारलेल्या जवानांची संख्या विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय.

– डिजीटल इंडीयाची पोलखोल