वाढलेलं पोट आणि वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं ‘हे’ खास तेल ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   वजन वाढू नये किंवा पोट वाढू नये यासाठी तेलापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. परंतु असं एक तेल आहे जे वजन कमी करण्यासाठी आणि पोट कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. हे तेल आहे एरंडीचं तेल. याचा कसा फायदा होतो हे आपण जाणून घेणार आहोत.

1) फॅटकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू नका – फॅटही शरीरात आवश्यक आहे. तेल आपल्या डाएटचा अविभाज्य घटक आहे. परंतु तुमची तेलाची चॉईस ही स्मार्ट असावी. वेगवेगळ्या तेलाचं सेवन करून तुम्ही वाढलेलं पोटं कमी करू शकता. यापैकीच एक आहे कॅस्टर ऑईल म्हणजेच एरंडीचं तेल.

2) अँटीओबेसिटी एजंट – या तेलात रिसिनोलेईक अॅसिड असतं. हे एक ट्रायग्लिसराईड फॅटी अॅसिड असतं. हे अॅसिड लॅक्सेटीवच्या रूपात काम करतं. हे अॅसिड अॅटीओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा कमी कणाऱ्या एजंटच्या रूपातही ओळखलं जातं. यानं केसांची वाढ तर होतेच. शिवाय या तेलानं पोटदुखीची समस्या दूर करण्यास मदत होते.

3) मेटाबॉलिजम – एरंडीच्या तेलाच्या सेवनानं मेटाबॉलिजम मजबूत होतं. यामुळं वजन कमी करण्यास खूप मदत होते.

4) शरीर डिटॉक्स होतं – वॉटर रिटेंशन म्हणजे शरीरात काही अवयवात पाणी जमा झाल्यानंही लठ्ठपणा येतो. एरंडीचं तेल शरीरावर लावल्यां किंवा याचं सेवन केल्यानं कोलोन आणि डायजेस्टीव सिस्टीमच्या आजूबाजूला जमा झालेलं अतिरीक्त पाणी शरीरातून बाहेर पडतं. याच प्रक्रियेतू शरीर डिटॉक्स होतं.

‘असं’ करा सेवन

– एरंडीच्या तेलाची चव चांगली नसते. अशात तुम्ही काही प्रमाणातही याचं सेवन करू शकता. जसं की, सकाळी उपाशीपोटी 1 चमचा तेलाचं सेवन करणं. परंतु याआधी तज्ज्ञांचा सल्लाही जरूर घ्यावा.

– टेस्ट आवडली नाही तर याचं सेवन आल्याच्या रसासोबतही करू शकता.

– या तेलानं पोटाची आणि नाभिच्या जवळच्या भागाची मालिश केल्यासही पोट कमी होण्यास फायदा होतो.

या गोष्टींची काळजी घ्या

– अतिसेवन कधीच चांगलं नसतं. त्यामुळं याचंही सेवन प्रमाणात असावं. कारण यामुळं डायरिया आणि इतर समस्या होऊ शकतात.

– वजन कमी करण्यासाठी जर या तेलाचं सेवन करत असाल तर पोषक आणि संतुलित आहार घ्या.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही लोकांना अॅलर्जीची समस्याही असते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like