‘त्या’ प्रकरणात भाजपसह कॉंग्रेस, शिवसेना, बसपला कारणे दाखवा नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनसाईन – मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा होर्डिंगच्या प्रश्नावरून भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, पूनम महाजन व नगरसेविका अलका केसकर यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश देत काँग्रेस, शिवसेना आणि बसपलाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

होर्डिंग्जप्रश्नी पक्षातील कार्यकर्त्यांवर कोणतीही कारवाई होत नाही तसेच जबाबदारीपुर्वक समाधानकारक पावले उचलली गेली नसल्याचे पाहून न्यायालयाने काँग्रेस, शिवसेना व बसपला न्यायालय अवमानाबद्दल कारणे दाखवा नोटीशीवर २ मे रोजी उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. पक्षाने यापुर्वीच ताकीद देणारे परिपत्रक काढले होते. त्यासोबतच वर्तमानपत्रात २२ एप्रिल रोजी जाहिर सुचना प्रसिद्ध करण्यात आली होती. असे म्हणणे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मुरली देवरा यांच्या वतीने वकीलांनी मांडले होते. मात्र हे उत्तर समाधानकारक नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

आशिष शेलार हे स्वत: ही वकील आहेत. त्यांनी न्यायालयात पक्षातर्फे लेखी हमी दिलेली आहे. तरीही त्यांच्याकडून उल्लंघन झाले. असे पर्यावरणप्रेमी झोरू बथेना यांनी म्हटले आहे.

त्या संबंधित पोस्टर्स आणि बॅनरसाठी पालिकेकडून परवानगी घेतली होती का याची तपासणी करून न्यायालयाला सांगतो, थोडा कालावधी द्या अशी विनंती अ‍ॅड. राजेश सिंग यांनी केली. तेव्हा न्यायालयाने २ आठवड्यात प्रतिज्ञापत्रावर स्पष्टीकरण द्या असे निर्देश दिले.