खुषखबर ! आता घरबसल्या बदलता येणार ‘आधारकार्ड’वरील पत्‍ता, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधारकार्डची निर्मिती करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) नागरिकांच्या सुविधेसाठी एक महत्वपूर्ण तरतूद केली आहे. UIDAI कडून आता सेल्फ सर्व्हिस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेल्फ सर्विसचा वापर करून आता घरबसल्या आधारकार्डवरील पत्ता बदलता येणार आहे. यासाठी आधारप्रणालीसोबत तुमचा मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे. लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त होईल. त्यानंतर पुढील प्रकीया करता येईल.

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच आर्थिक व्यवहार करण्यासाठी आधारकार्ड असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आधारकार्ड काढत असताना काही वेळा नागरिकांकडून त्यांच्या घरचा पत्ता चुकतो किंवा प्रत्येक नागरिकाकडे कायमचा पत्ता असेलच असे नाही.ही समस्या ओळखून UIDAI ने अशी तरतूद केली आहे.

  • पत्ता बदलण्यासाठी कोणत्या कागदपत्राची गरज लागेल
    – आधारकार्डवरील पत्ता बदलण्यासाठी सेल्फ अटेस्टेड पत्याचा पुरावा असणे गरजेचे आहे.
    – बँकेचे पासबुक
    – रेशनकार्ड, मतदान कार्ड, वाहन परवाना
    – सरकारी ओळखपत्र यांसारखी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.
  • अशी आहे प्रक्रिया
    – uidai.gov.in या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आधारकार्ड क्रमांकाद्वारे रजिस्टर्ड मोबाईल       क्रमांकावर लॉग इन करता येऊ शकते.
    – लॉग इन केल्यानंतर update address via address proof या सेवेच्या माध्यमातून   आधारकार्डवरील पत्ता अपडेट करता येणार आहे.आरोग्यविषयक वृत्त