तुमची फुफ्फुस किती सक्षम?, ‘या’ सोप्या पध्दतीनं घरबसल्या तपासा

पोलीसनामा ऑनलाइनः देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. साधा ताप, सर्दी झाल्यास, दम लागल्यावरही आता अनेकांना भीती वाटत आहे. कोरोना विषाणू थेट फुफ्फुसांवर करत असल्याने या काळात फुफ्फुसांची काळजी घेणं आवश्यक आहे. तुमची फुफ्फुसाचे आरोग्य उत्तम स्थितीत आहे ना, याची घरच्याघरी पडताळणी करून पाहणे अतिशय सोप आहे. याबाबत मेदांता रुग्णालयाचे डॉ. अरविंद कुमार यांनी फुफ्फुसांची क्षमता तपासून पाहण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.

तुम्हाला घरबसल्या श्वास रोखून अन् 6 मिनिटं चालून फुफ्फुसांची क्षमता तपासता येऊ शकते. यासाठी एका जागी बसून दिर्घ श्वास घ्या. श्वास रोखून धरा. जितका जास्त वेळ श्वास रोखता येईल तितका वेळ रोखून धरा. प्रत्येक तासातून एकदा दीर्घ श्वास घ्या. श्वास रोखण्याचा सराव करा. श्वास रोखून धरण्याचा कालावधी रोज 2-3 सेकंदानी वाढत असेल आणि तो 25 ते 50 सेकंदाच्या वर असले तर तुमच्या फुफ्फुसाचे आरोग्य उत्तम स्थितीत आहे. फुफ्फुसांच्या स्थितीसोबतच शरीरातील ऑक्सिजन सॅच्युरेशनदेखील तपासून पाहणे गरजेचे आहे. त्यानंतर 6 मिनिट चाला. त्यानंतर ऑक्सिजन सॅच्युरेशन तपासून बघा. सॅच्युरेशनमध्ये3-4 टक्क्यापेक्षा जास्त घट होत नसेल तर तुमची फुफ्फुस सशक्त आहेत. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. फुफ्फुस उत्तम राखण्यासाठी तुम्हाला घरच्या घरी व्यायामदेखील करता येऊ शकते.