Corona Virus : ‘कोरोना’ व्हायरसच्या रूग्णांवर चीनकडून अमानुष ‘अत्याचार’, ‘बॉक्स’मध्ये केलं जातंय ‘बंद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी चीन कुठलीही हद्द पार करू शकते. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 40,171 लोकांना विषाणूची लागण झाली आहे, तर 187,518 लोक डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. या दरम्यान असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात चिनी अधिकारी कोरोना विषाणूच्या रुग्णांशी गैरवर्तन करीत असल्याचे दिसून येत आहे.

एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण एका बॉक्समध्ये बंद ठेवून ट्रकमध्ये ठेवण्यात आला आहे. बॉक्समध्ये लॉक झाल्यानंतर महिला मोठ्याने ओरडत आहे. महिलेचा जोडीदार तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करतो पण बॉक्समध्ये लॉक केल्यानंतर ती स्त्री जोरजोरात ओरडू लागते.

दुसर्‍या व्हिडिओमध्ये चीनी पोलिस कोरोना विषाणूची लागण झालेल्या संशयितास जबरदस्तीने ताब्यात घेत असल्याचे दाखविण्यात आले आहे. महिलेला तिच्या गाडीतून जबरदस्तीने बाहेर खेचले गेले. पोलिस अधिकारी नंतर तिला रस्त्यावर सोडतात आणि मग ट्रान्सपोर्ट व्हॅन येऊन तिला घेऊन जाते. तसेच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे ज्यामध्ये लोकांना घराबाहेर ओढले जात आहे. यावेळी बरेच लोक प्रचंड प्रतिकार करतात.

या लीक व्हिडिओंमुळे काही लोक असा निष्कर्ष काढू शकले आहेत की चिनी अधिकारी जगातील कोरोना विषाणूचे परिणाम लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. चीनी प्रशासनाने व्हायरसची केंद्र वुहान पूर्णपणे बंद केले आहे. सर्वात व्यस्त असणाऱ्या शहरात एखाद्या झपाटलेल्या बंगल्यासारकाही स्मशान शांतता पसरली आहे.