‘कॅन्सर’ नव्हे तर ‘या’ 4 कारणांमुळं देखील स्तनांमध्ये तयार होते गाठ ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेक महिला अशात आहेत ज्यांना स्तनांचा कॅन्सर होतो. 40 ते 50 वयोगटातील महिलांना याचा धोका जास्त असतो. परंतु स्तनांमध्ये आलेली गाठ ही कॅन्सरचीच असेल असं नाही. याची इतरही काही कारणं असतात. याचबद्दल आज माहिती घेऊयात.

1) हार्मोन्समधील बदल – वय जसं वाढत जातं तसं स्तनांमध्ये गाठी येतात. इतकंच नाही मासिक पाळीदरम्यानही स्तनांचा आकार बदलतो आणि गाठी येण्याची शक्यता असते. अशी लक्षणं जाणवल्यास घाबरून न जाता तपासणी करून घ्या.

2) मासिक पाळी – काही महिलांमध्ये मासिक पाळी येण्याआधी किंवा त्या दरम्यान शरीरात अनेक बदल होतात. छातीला सूज येणं, तीव्र वेदना होणं असं काही होतं. पाळीच्या 1 आठवडा आधीच ही समस्या सुरू होते. परंतु मासिक पाळी पूर्ण झाल्यानंतर या वेदना कमी होतात.

3) फाइब्रोडिनोमा – जर स्तनांमध्ये आलेली गाठ ही फाइब्रोडिनोमाची असेल तर यात घाबरण्यासारखं काहीच नाही. कारण ही गाठ कॅन्सरची नसते. 40 ते 50 वयातील महिलांना अशा समस्या जाणवत असतात. स्तनांमधील ग्रंथी जास्त वाढल्यानं गाठ येण्याची शक्यता असते.

4) सिस्ट – सिस्ट या स्थितीत स्तनांमध्ये गाठ झाली असेल तर त्यात द्रवपदार्थ असतो. ही गोलाकार गाठ असते. ही गाठ दाबल्यानंतर एका जागेवरून दुसऱ्या जागी सरकते. मासिक पाळी सुरू होण्याआधी किंवा त्यादरम्यान अशी समस्या येते. परंतु पाळी नंतरही ही समस्या कमी झाली नही तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.