Coronavirus News Updates : तज्ज्ञांचा दावा : ‘फ्लू’च्या लसीमुळे ‘कोरोना’चा धोका 39 टक्क्यांनी होणार कमी

पोलीसनामा ऑनलाईन- कोरोनाच्या (coronavirus) वाढत्या संक्रमणात जगभरातील लोक एक सुरक्षित आणि परिणामकारक लसीच्या प्रतिक्षेत आहे. रशिया, चीन या देशात आपातकालीन स्थितीत लसीकरणाला सुरुवात झाली असून जोखिम घेऊन लोकांना लस दिली जात आहे. इंडोनेशिया आणि ब्रिटेनमध्ये पुढच्या महिन्यापासून लसीकरण सुरू होणार असल्याची चर्चा आहे. भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. हिवाळ्यात कोरोनासह फ्लूसारखे अन्य आजार पसरण्याचा धोका वाढत आहे. अनेक तज्ज्ञांकडून कोरोनाची लस उपलब्ध होईपर्यंत फ्लू या आजाराची लस दिली जाण्याचा सल्ला दिला जात आहे. या अभ्यासातून वैज्ञानिकांनी सांगितले की, फ्लूच्या लसीमुळे कोरोनाचं संक्रमण कमी (flu-vaccine-may-help-reduce-covid-19-infection)होण्यास मदत मिळते.

नेदरलँडच्या रेडबाऊंड युनिव्हर्सिटीतील एका संशोधनात वैज्ञानिकांनी सांगितले की, फ्लूची लस कोरोना व्हायरसपासून बचावसाठी कशी परिणामकारक ठरते. रेडबाऊंट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या इम्यूनेलॉजिस्ट मिहाई नेटी यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2019-20 मध्ये हिवाळ्याच्या वातावरणात फ्लूची लस दिली होती. त्यांच्यावर कोरोनाचा होणारा प्रभावाचा अभ्यास केला होता. या संशोधनातून समोर आले की, ज्या लोकांना फ्लू ची लस दिली होती. त्यांच्यात कोरोना संक्रमणाचा धोका 39 टक्क्यांनी कमी झाला होता.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, फ्लूची लस शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवते, ज्यामुळे अनेक प्रकारच्या व्हायरसशी लढण्याची क्षमता मिळते. हे विशिष्ट साइटोकाइन स्ट्रोम्सना देखील प्रतिबंधित करते. सायटोकीन स्ट्रोम, अशी स्थिती असते ज्यामध्ये कोरोना संक्रमणानंतर रोगाचा प्रतिकार करणारी रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रिय होते, अनियंत्रित होते त्यामुळे शरीराला हानी पोहोचते.

फ्लूची लस का गरजेची आहे
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हिवाळ्यात कोरोना आणि फ्लू या दोघांच्या विषाणूजन्य संक्रमणाचा धोका वाढू शकतो. शास्त्रज्ञांनी अशा संभाव्य स्थितीस ‘ट्विन्डेमिक’ असे नाव दिले आहे. त्यांना असा विश्वास आहे की कोल्ड इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी सर्व लोकांनी फ्लूची लस घेणं आवश्यक आहे. दिल्ली एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनीही असा सल्ला दिला आहे.