MS धोनीच्या प्लॅनमुळे मुंबई इंडियन्सचा संघ हरला

पोलिसनामा ऑनलाईन –  आयपीएल स्पर्धेच्या 2010 च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाला पराभूत करून चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजेतेपद पटकावले. उत्तम फलंदाज आणि भेदक मारा करणारे गोलंदाज असा समतोल संघ असणार्‍या चेन्नईने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. संघात फिरकीपटू म्हणून असलेल्या डावखुर्‍या शादाब जकातीने त्या हंगामात उजव्या हाताच्या फलंदाजांना खूप त्रास दिला होता. अंतिम सामन्यात त्याने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला फिरकीच्या जाळ्यात ओढले होते. त्यामागे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे डोके होते.

शादाब जकातीने नुकत्याच विस्डन इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, धोनीच्या एका महत्त्वाच्या प्लॅनमुळे आयपीएलचचे पहिले विजेतेपद मिळू शकले. अंतिम सामन्यात माझ्या पहिल्या दोन षटकांत मुंबईच्या फलंदाजांनी 21 धावा ठोकल्या होत्या. डावखुरा अभिषेक नायर फलंदाजी करत असल्याने धोनीने मला गोलंदाजीवरून काढून टाकत

12 व्या षटकानंतर पुन्हा गोलंदाजी करायची असल्याचे सांगितले.
मुंबईकडे सचिन तेंडुलकर, अंबाती रायडू आणि कायरन पोलार्ड असे प्रतिभावंत उजव्या हाताचे फलंदाज आहेत, त्यांना तू गोलंदाजी कर, असे धोनी म्हणाला होता. मुंबईच्या उजव्या हाताच्या फलंदाजांचा आम्ही अभ्यास केला होता. ते डावखुर्‍या फिरकीपटूच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्यात कमी पडत होते हे आम्हाला कळले होते. त्यामुळे धोनीने तसा प्लॅन आखला. मुंबईच्या संघाची गाडी नीट रूळावर होती. त्यांना शेवटच्या सहा षटकात 74 धावा हव्या होत्या. त्यानंतर पंधरावे षटक धोनीने मला टाकायला सांगितले. मी सचिनपासून चेंडू वळवून दूर नेऊ शकतो हे त्याला माहिती होते. सचिन दुसर्‍याच चेंडूवर बाद झाला अन् सामना फिरला, असे जकातीने सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like