दिल्ली HC ने गौतम गंभीरला फटकारले, म्हणाले – ‘राजकीय नेत्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात औषध कशी पोहोचली?’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना उपचारात वरदान ठरलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे रुग्णांना ते सहज उपलब्ध होत नव्हते. अशातच भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने दिल्लीतील नागरिकांसाठी रेमडेसिवीर आणि फॅबीफ्लू औषधांचं मोफत वाटप केले आहे. यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर याला खडेबोल सुनावले आहेत. राजकीय नेत्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधं कशी पोहोचली?; कुणाच्या प्रिस्क्रिप्शननं इतक्या मोठ्या प्रमाणात औषध गंभीर यांना उपलब्ध करून दिली असा सवालही हायकोर्टानं विचारला आहे. हायकोर्टाने घेतलेल्या भूमिकेमुळे आता गौतम गंभीर याला रेमडेसिवीर आणि फॅबीफ्लू औषधांचे वाटप प्रकरण भोवणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गौतम गंभीर एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू राहिला आहे. ते आता एक राजकीय नेते देखील आहे. त्यांनी गरजूंना रेमडेसिवीर अन् फॅबीफ्लूची औषध वाटली. पण त्यांनी केलेल्या मदतीचे स्वरुप हे योग्य होत का? त्यांच्या वागण्याला जबाबदार नागरिकाच वागणे म्हणता येईल का? देशात या औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला असताना त्याचा साठा आपल्याकडे करणे योग्य ठरेल का याचा विचार त्यांनी का नाही केला? अशा प्रश्नांची सरबत्तीच हायकोर्टाने उपस्थित केली आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने या प्रकरणात लक्ष घालावे आणि औषधांचा असा मोठ्या प्रमाणात साठा करणे गुन्हा नाही का याची पडताळणी करुन योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना हायकोर्टाने दिल्या आहेत. यात एकट्या गौतम गंभीर यांच्यावर नव्हे, तर ज्या डॉक्टरनं इतक्या मोठ्या प्रमाणात औषध मागवण्यासाठी प्रिस्क्रिप्शन दिले आहे. ज्या केमिस्टन पुरवठा केला यासर्वांची माहिती घेऊन त्यांना यात जबाबदार धरावे असेही हायकोर्टाने नमूद केले आहे.