येरवडा मनोरुग्णालयात मद्यधुंद रूग्णाचा कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दारू पिलेल्या रूग्णाने एका कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आश्चर्य म्हणजे याठिकाणी रूग्णाला दारू उपलब्ध कशी झाली, असा प्रश्न निर्माण झाला असून एकुणच रूग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वॉर्ड क्रमांक २७ मध्ये हा गंभीर प्रकार घडला. संबंधित रुग्णाने दारू पिलेली असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

…तर, मी नक्षलवाद्यांचे नेतृत्व करायला तयार : उदयनराजे 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येरवडा मनोरुग्णालयात सोळाशेहून अधिक महिला आणि पुरुष रुग्ण उपचार घेत आहेत. मनोरुग्णांची देखभाल करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात कर्मचारी आणि वॉर्डाच्या गेटवर हवालदार नेमलेले असतात. २७ क्रमांक वॉर्डात झोपलेल्या अनिल गायकवाड या रुग्णाला बाजूला सरकून झोप असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. त्या वेळी हिंसक झालेल्या गायकवाडने त्या कर्मचाऱ्याचा गळा दाबून मारहाण करण्यास सुरुवात केली. रुग्ण मारहाण करीत असल्याचे लक्षात आल्यावर हवालदार आणि डॉक्टरांनी वॉर्डात धाव घेत रुग्णाला पडकले. त्यानंतर हिंसक रुग्णाला झोपेचे इंजेक्शन देऊन उंच वॉर्डात हलविण्यात आले. हा प्रकार घडत असताना रूग्णालयात प्रचंड गोंधळ उडाला होता. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

भाजपचं कुत्रं तरी स्वातंत्र्याच्या लढाईत होतं का? : अशोक चव्हाण 

या घटनेबाबत माहिती देताना रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, अनिल गायकवाड या रुग्णाने रात्री दारू प्यायली होती. दारू पिऊन तो वॉर्डातील ये-जा करण्याच्या रस्त्यावर झोपला होता. त्याला कर्मचाऱ्याने बाजूला सरकून झोपण्यास सांगितले. तेव्हा चिडलेल्या गायकवाडने मारहाण केली. चोख सुरक्षा व्यवस्था असतानाही रुग्णापर्यत दारू पोहचली कशी आणि दारू त्यांना कोणी दिली, असा प्रश्न विचारला जात आहे.