‘होम क्वारंटाइन’ असताना आपल्या वजनावर कसे ठेवाल नियंत्रण ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाय योजना केल्या जात आहे. नागरिकांना घरात राहण्यास सांगण्यात येत आहे. तर कंपनीत किंवा खासगी ठिकाणी काम करणाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांनी घरून काम करण्यास सुरुवात केली. कोरोना व्हायरसपासून आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी सामाजिक अंतर राखणे आणि घरातच क्वारंटाइन म्हणजे विलग होणे आवश्यक आहे.

मागील काही दिवसांपासून आपण घरात बसून आहात आणि पुढचे काही दिवस आपल्याला अशाच प्रकारे घरात बसावे लागणा आहे. घरी असल्यामुळे काहीही खाऊ नका कारण आपण घरात बसून राहिल्याने आपल्याला वारंवार भूक लागते शिवाय व्यायाम नसल्याने याचा परिणाम आपले वजनावर पडू शकतो. आपले वजन वाढू शकते. त्यामुळे करोनाला दूर ठेवताना आपले वजन वाढवून इतर आजारांना आमंत्रण देऊ नका. आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काही टिप्स…

आरोग्यदायी स्नॅक्स खा
घरात बसून राहिल्याने काहीजण टीव्ही पाहणं, मोबाईलवर सिनेमा पाहणे, नेटफ्लिक्सवर बेवसीरीज बघत असतात. याचा कंटाळा आला की लगेच आपले हात स्नॅक्सवर जातात. अरबट चरबट स्नॅक्स चवीला चांगले लागतात पण याचा आपल्या शरिरावर परिणाम होतो. तसेच असे अरबट चरबट खाल्ल्याने वजन देखील वाढू शकते. त्यामुळे घारामध्ये अशा प्रकारचे खाणे टाळून फळं, गाजर, उकडलेली अंडी, नट्स हे स्नॅक्स म्हणून खावा.

आहारामध्ये प्रथिनाचा समावेश करा
घरात बसून काहीही खाल्याने आपले वजन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारामध्ये प्रथिनांचा समावेश करा. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर न्यूट्रिएंट्समध्ये प्रोटिन्सला म्हणजेच प्रथिनांना प्राधान्य द्या. रोजच्या आहारामध्ये प्रथिनांचा समावेश पुरेसा असेल याची काळजी घ्या.

साखरेवर नियंत्रण ठेवा
घारात बसून राहिल्याने उठसूठ चहा पिऊ नका. चहामुळे तुमच्या शरिरात अतिरिक्त साखर जाऊ शकते. दिवसभरात शरिराला दोन चमचे साखर पुरेशी आहे. दोन चमच्यापेक्षा अधिकची साखर आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे जास्त साखर आपल्या शरिरात जाणार नाही याची काळजी घ्या.

भरपूर पाणी प्या
पाणी आपल्या शरिराला आवश्यक आहे. भरपूर पाणी पिल्याने आपले वजन कमी होऊ शकते, हा दावा खरा आहे. त्यामुळे ठराविक वेळाने पाणी प्या. शरिरात भरपूर पाणी गेल्याने आपले आरोग्य चांगले राहिल. त्यातल्या त्यात कोमट पाणी पिल्यास आणखीनच उत्तम.

लिक्विड कॅलरीज आणि व्हाइट रिफाइन्ड कार्ब्ज टाळा
स्वॉफ ड्रिंक्स, फ्रूट ज्यूस, चॉकलेट मिल्क, एनर्जी ड्रिंक्स ह्यांमधून शरीरात लिक्विड कॅलरीज जातात आणि व्हाइट ब्रेड पास्ता, पेस्ट्री, मिठाई ह्यांमधून रिफाइन्ड कार्ब्ज याचे सेवन टाळा.

ध्यान कार पुरेशी झोप घ्या
सध्या आपण कोरोनाच्या सावटाखाली आहोत. यामुळे मन शांत राहणं किंवा मन जाणीपूर्वक शांत ठेवणे हे सोपी गोष्ट नाही. पण कोरोनाचा अधिक विचार करणं किंवा त्याविषयी चिंता करत बसण, ह्यामुळे तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. मात्र, याचा ताण आल्याने याचा परिणाम तुमच्या शरिरावर मात्र हमखास होऊ शकतो. यासाठी नियमित ध्यानधारणा करा, नियमित व्यायाम करा, सूर्यनमस्कार, योगासनं किंवा दोरीच्या उड्या हे व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या.