Coronavirus : पहिले COVID-19 ! आता फोफावतोय नवा ‘कोरोना’ व्हायरस, घ्या ‘ही’ काळजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : नवीन कोरोना विषाणू SARS-CoV-2 सध्या जोराने पसरत आहे. सीडीसीच्या मते हा नवीन विषाणू एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरतो. त्यामुळे लोकांनी एकमेकांपासून 6 फूट अंतर ठेवणे आवश्यक आहे.

कोरोना विषाणू COVID-19 ची सुरूवात कफ आणि शिंकण्यापासून होते. बाधित व्यक्तीला खोकला आला किंवा तो शिंकला तर आसपासचे लोक देखील त्याच्या चपेटमध्ये येतात. परंतु चांगली बाब ही आहे की हा नवीन विषाणू इतर विषाणूंइतका संक्रामक नाही.

ज्या जागेवर हा विषाणू असण्याची संभावना आहे, तिथे गेल्याने तोंडाला, नाकाला किंवा डोळ्यांना स्पर्श केल्याने देखील SARS-CoV-2 या विषाणूचे संक्रमण होण्याची शक्यता आहे. तथापि, सीडीसीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या पद्धतीने संक्रमण ह्ण्याची संभावना तशी कमीच आहे.

काही कोरोना विषाणू बरेच दिवस सक्रिय असतात, परंतु या नवीन कोरोना विषाणूविषयी माहिती नाही की तो किती काळापर्यंत टिकतो. दिलासा देणारी बाब म्हणजे पृष्ठभागावर राहणाऱ्या या विषाणूंना इथेनॉल, हायड्रोजन-पेरोक्साईड किंवा ब्लीचने बनवलेल्या क्लीनरने मारले जाऊ शकते.

ड्रॉपलेट्समूळे सामान्य जंतू जास्त काळ हवेमध्ये राहतात, परंतु हा विषाणू जास्त काळ हवेमध्ये राहात नाही. उदाहरणार्थ, चेचक जंतू अनेक तास हवेमध्ये राहू शकतात, परंतु SARS-CoV-2 च्या बाबतीत असे नाही.

नवीन कोरोना विषाणू विष्ठापासून देखील पसरत असल्याचा फारसा पुरावा मिळालेला नाही. एका अभ्यासानुसार, COVID-19 पासून ग्रस्त लोकांच्या विष्ठेच्या नमुन्यात सूक्ष्मदर्शी अंतर्गत सूक्ष्म विषाणूचे कण दिसले आहेत.

चीनच्या सीडीसीने आपल्या अहवालात लिहिले आहे की, संक्रमित मलच्या अवशेषांच्या दूषित जागेला स्पर्श करून जर एखाद्या व्यक्तीने हात धुतले नाहीत आणि त्याच हाताने त्याने आपल्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श केला असेल तर त्याला संसर्ग होण्याची शक्यता असते.

हा नवीन कोरोना विषाणूला टाळण्यासाठी आरोग्य अधिकारी लोकांना आजारी व्यक्तीपासून दूर रहाण्याचा सल्ला देत आहेत. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी फेस मास्क प्रभावी नाहीत, त्याऐवजी आधीच आजारी असलेल्या लोकांनी फेस मास्क लावले पाहिजे.

आधीच आजारी असणाऱ्या व्यक्तीने फेसमास्क लावून इतरांना कफ आणि खोकल्याच्या थेंबापासून वाचवावे. अमेरिकेतील वँडरबिल्ट युनिव्हर्सिटीमधील संसर्गजन्य रोगतज्ज्ञ विल्यम शेफनर यांनी सांगितले आहे की आजारी पडण्यावर फेस मास्क घालून बाहेर जाण्यापेक्षा घरीच राहणे चांगले.

सीडीसीने लोकांना डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करण्यापासून सावधानता बाळगण्यास सांगितले आहे. वारंवार हात धुणे, 20 सेकंद पर्यंत हात धुणे आणि 20 ते 95 टक्क्यांपर्यंत अल्कोहल बेस्ड हॅन्ड सॅनिटायझरमुळे हा विषाणू नष्ट होऊ शकतो.