रोजच्या जगण्यात ‘हे’ सोपे बदल करून कायमचंच दूर करा पाठीचं दुखणं ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आजकालची जीवनशैली आणि आणि जास्तीत जास्त बसून काम करणं यामुळं अनेकांना पाठदुखीची समस्या उद्भवते. 30 ते 40 वयोगटात ही समस्या जास्त जाणवते. रोजच्या जगण्यात काहीसा बदल करून आपण कमरेचं किंवा पाठीचं दुखणं दूर करू शकता. यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

ही घ्या काळजी

1) तज्न सांगतात की, कोणतंही काम करताना किंवा बसताना आपल्या शरीराची पोजीशन कशी आहे याकडे आपण लक्ष द्यायला हवं. जर तुम्ही वाकून बसत असाल तर यामुळंही तुम्हाला त्रास होऊ शकतो. बसताना ताठ बसा.

2) तुम्ही सतत बसून काम करत असाल तर अधून मधून शरीराची स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे.

3) शरीरात पुरेसं कॅल्शियम जाईल याचीही काळजी घ्या. आहारात फळं आणि भाज्या यांचा समावेश करा.

4) कोवळं ऊन घ्यायला विसरू नका. यामुळं तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळेल.

5) रोज किमान 10 मिनिटे एखादा व्यायाम करा. हळूहळू हा टाईम वाढवत न्या.

6) योगासन हा पाठदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. नियमित योगा केल्यास मणक्यांचे स्नायू अधिक लवचिक आणि बळकट होतात.

7) उभं राहत असताना सरळ रेषेत उभं रहा. दोन्ही पायांवर समांतर वजन जाईल अशी पोजिशन ठेवा. डोकं देखील मणक्याच्या सरळ रेषेत असेल याची काळजी घ्या.

8) फ्लॅट शुज वापरल्यानं पाठीवर कमी ताण येतो.

9) जर एखादी जड वस्तू उचलत असाल तर गुडघ्यात वाकायला हवं. पाठ सरळ ठेवून ती वस्तू उचला.

10) एकाच स्थितीत जास्त वेळ बसू नका. ठराविक वेळेनंतर बसण्याची स्थिती बदला. पाठ सरळ ठेवा. अधून मधून फिरून या.

11) चुकीच्या स्थितीत झोपणंही टाळायला हवं. जर एका कुशीवर झोपत असाल तर कमरेला आराम मिळेल अशा स्थितीत झोपा. उशी घेतानाही जास्त उंच नसावी.

12) जास्तीत जास्त पाणी प्या.