स्पा विसरा ! साखर-शॅम्पूच्या मदतीनं मिळवा लांब, दाट अन् मजबूत केस ! केसगळती व कोंडाही होईल दूर

पोलीसनामा : ऑनलाइन टीम – प्रत्येक मुलीला लांब आणि चमकदार केस हवे असतात. अनेकदा महाग शॅम्पू आणि स्पा करूनदेखील हवा तसा परिणाम मिळत नाही. आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. खास बात अशी की, यासाठी तुम्हाला काहीही खर्च करावा लागणार नाही. तुम्हाला यासाठी फक्त शॅम्पू करताना साखरेचा वापर करायचा आहे. याचा वापर करूनही तुम्ही केस मऊ, मजबूत ठेवू शकता. केसांची वाढही चांगली होते. पार्लरपेक्षाही हा खूप सोपा उपाय आहे.

असा करा वापर – यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा.
– एका वाटीत शॅम्पू काढून घ्या
– यात एक चमचा साखर मिक्स करा.
– आता हे मिश्रण केसांना लावून मसाज करा.
– मसाज केल्यानंतर केस पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या

काय आहेत साखरेचे फायदे ?
1) केस दाट आणि मजबूत होतील – जर तुम्हाला केस दाटआणि मजबूत करायचे असतील तर शॅम्पूमध्ये साखर मिसळून केसांवर चोळा. यानंतर केस धुवून काढा. यामुळं केस दाट आणि मजबूत होतील.

2) लांब केस – जर तुम्हाला केसांची वाढ हवी असेल तर आठवड्यातून एकदा हा उपाय केला तरीही तुम्हाला फरक दिसून येईल.

3) कोरड्या केसांसाठीही फायदा – जर तुमचे केस कोरडे असतील तरीही तुम्हाला याचा फायदा होईल. शॅम्पू आणि साखर यांचं मिश्रण लावलं तर केस चांगले राहतात.

4) कोंडा – अनेकांना कोंड्याची समस्या असते. साखर आणि शॅम्पूचं हे मिश्रण लावलं तर कोंड्याची समस्याही दूर होते.

5) पुळ्या येत नाहीत – उन्हाळ्यात अनेकांना खाज येणं, घामोळ्या येणं, पुळ्या येणं अशा समस्या येत असतात. कारण तुमचा स्काल्प खराब होत असतो. यामुळं केसही गळू लागतात. म्हणून हा उपाय जर केला तर फायदा मिळेल.