‘अशी’ कमी करा चेहऱ्यावर आलेली सूज ! जाणून घ्या ‘हे’ 5 सोपे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन – इंफ्लेमेशन, वॉटर रिटेंशन, वजन वाढणं अशा विविध कारणामुळं चेहऱ्यावर सूज येते. परंतु चिंता करायचं कारण नाही. ही सूज दूर करता येते. यासाठी काही सोपे उपाय जाणून घेऊयात.

1) अल्कोहोलचं सेवन टाळून पाण्याचं सेवन वाढवा – अनेकदा वॉटर रिटेंशन म्हणजेच शरीराच्या काही भागांमध्ये पाणी जमा होतं. हेही कारण आहे की, चेहऱ्यात बदल होतो. यामुळं तुम्ही डिहायड्रेट होत असता. यासाठी पाणी अधिक प्रमाणात प्या आणि अल्कोहोलचं सेवन करू नका.

2) पुरेशी झोप – झोप कमी घेतल्यानंही चेहऱ्यावर सूज येते किंवा चेहरा फुगलेला दिसतो. कमी झोप घेतल्यानं अनेक प्रकारचे हार्मोन्स प्रभावित होत असतात. यामुळं शरीरात इंफ्लेमेशन होतं. यासाठी पुरेशी झोप घ्यायलाच हवी.

3) सोडियम आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचं सेवन करा – तुम्ही मीठ किंवा जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेटयुक्त आहार घेत असाल तरीही शरीरात तरल पदार्थ जमा होतात आणि इंफ्लेमेशन वाढून चेहरा सुजतो. यासाठी सोडियम आणि कोर्बोहायड्रेटयुक्त आहार घ्यायला हवा.

4) सक्रिय रहा – जास्त शारीरिक हालचाली केल्यास वजन कमी होतं आणि याचा फरक चेहऱ्यावरही दिसतो. यासाठी एक्सरसाईज किंवा जास्त फिजिकल अ‍ॅक्टीविटी करून तुम्ही सक्रिय राहणं गरजेचं आहे.

5) अँटी इंफ्लेमेटरी पदार्थांचं सेवन करा – यासाठी तुम्ही आलं, नारळ, हळद हे पदार्थ असलेला आहार घ्यायला हवा. यामुळं शरीरातील सूज कमी होते.